आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे सिद्धूचा आलिशान बंगला, GYM पासून SPA पर्यंत सर्व काही आहे येथे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवजोतसिंग सिद्धूचे घर. - Divya Marathi
नवजोतसिंग सिद्धूचे घर.
खेळाचे मैदान असो वा राजकारणाचा आखाडा, ठिकान कोणतेही असो नवजोतसिंग नेहमीच हसतमुख आणि आनंदी दिसतो. आज त्याचा जन्मदिवस. या प्रसंगी आम्ही आपल्याला सांगत आहोत अमृतसर येथील त्याच्या नव्या घरा संदर्भात.
49 हजार 500 चौरस फूट एवढ्या विस्तिर्ण जागेवर असलेल्या या आलिशान घरात स्वीमिंग पूल, जिम आणि स्पा सारख्या लग्झरी सुविधा आहेत. एवढेच नाही तर, 2014 मध्ये जेव्हा सिद्धू कुटुंबाने गृह प्रवेश केला होता, तेव्हा येथे स्थापित केलेल्या शिवलिंगाची बरीच चर्चेचा होते. अशी चर्चा होती की, हे शिवलिंग सिंगापूरहून मागवण्यात आले होते. याची किंमत साधारणपणे अडीच कोटी रुपये एवढी आहे. या शिवलिंगाच्या पुजेसाठी विविध ठिकाणांहून पंडितही बोलावण्यात आले होते. या पुजेत सिद्धूची पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धूदेखील त्याच्याबरोबर होती. या बरोबरच या घरात बांधण्यात आलेल्या मंदीरात माता गायत्री, भगवान गणेश आदी देवांच्या मौल्यावान मूर्ती आहेत. तर एका दुसऱ्या खोलीत श्री गुरु ग्रंथ साहिब ठेवण्यात आले आहेत.
गृह प्रवेशानंतर एका वर्षाने शिफ्ट झाले कुटुंब
मे 2014 मध्ये अमृतसर येथील या नव्या घराचा गृह प्रवेश तर केला गेल, मात्र सुद्धूचे कुटुंब येथे राहण्यासाठी आले नव्हते. ते येथे साधारणपणे एक वर्षानंतर जुलै 2015 मध्ये येथे राहण्यासाठी आले. हे घर बांधायला साधारणपणे तीन वर्षे लागली. बोलले जाते की, हे घर बांधणयासाठी सिद्धू कुटुंबाला साधारणपणे 25 कोटी रुपये खर्च आला.
या घराच्या गार्डनच्या चारही बाजूंना 100 ते 600 वर्षांपूर्वीच्या जुण्या प्रजातिंच्या झाडांची रोपे लावलेली आहेत. जी चेन्नई, गोवा आणि बेंगळुरु येथून मागवण्यात आली आहेत. ऑलिव प्रजातिंच्या झाडांची ऊंची 8 ते 12 फूट आहे. या शिवाय बोगन विलियाची 10 झाडे आहेत, ते साधारणपणे 100 ते 150 वर्ष जुनी आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...