आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet SriLanka Cricketer Kumar Sangakkara's Wife Yehali

ही आहे संगकाराची पत्नी, पर्सनल फोटो लीक झाल्यामुळे आली होती चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाच फोटो लीक झाला होता आणि संगकाराची पत्नी चर्चेत आली होती. यासह अनेक फोटो लीक झाले होते. - Divya Marathi
हाच फोटो लीक झाला होता आणि संगकाराची पत्नी चर्चेत आली होती. यासह अनेक फोटो लीक झाले होते.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सीरिजमधील सर्वात मोठा टॉकिंग पॉइंट श्रीलंकेचा स्टार प्लेअर कुमार संगकारा आहे. संगकारा दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेट सन्यास घेणार आहे. वन-डे आणि टी-20 मधून त्याने आधीच निवृत्ती घेतली आहे. 37 वर्षांचा संगकारा निवृत्तीनंतर पूर्णवेळ कुटुंबाला देणार आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते, की क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा इतरांना काही फायदा होईल असे काही करायला मला आवडेल.

कुमार संगकाराचे कुटुंब
संगकाराच्या पत्नीचे नाव येहाली आहे. या जोडप्याने 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केले होते. त्यांना जुळे झाले आहे. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. येहालीसोबत संगकाराची भेट झाली तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता.
लीक झाले होते पर्सनल फोटोज्
नोव्हेबर 2013 मध्ये संगाराची पत्नी चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आली होती. तिचे काही पर्सनल फोटोज इंटरनेटवर लिक झाले होते. त्यात ती पिंक कलरच्या रिव्हिलिंग नाइट ड्रेसमध्ये दिसत होती. या फोटोत तिच्यासोबत श्रीलंकेच्या क्रिकेटर्सच्या पत्नी देखली होती.
किस मुळेही आली होती चर्चेत
2014 मध्ये श्रीलंकेने आयसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा संगकाराने नाबाद 52 धावांची तडाखेबंद खेळी केली होती. श्रीलंकेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर विजयोत्सवात संगकाराने सर्वांसमोर पत्नीला किस केले होते. भारताविरोधातील हा सामना बांगलादेशात खेळाला गेला होता. तेव्हा संगकाराच्या खेळापेक्षा या 'किस'ची चर्चा अधिक झाली होती. एका मुलाखतीत या किस प्रकरणावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला होता, की आम्ही विजयाची आतुरतेने वाट पाहात होता आणि जेव्हा विजय मिळाला तेव्हा त्याचा आनंद साजरा केला. तर, त्याच्या पत्नी म्हणली होती, 'आम्ही एक्साइट झालो होतो, आम्हाला कळालेही नाही आणि ते होऊन गेले. त्यानंतर मला अवघडल्यासारखे झाले होते.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संगकाराची पत्नी आणि कुटुंबीयांचे फोटो...