आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीच्या चॅलेंजर्सवर मुंबई इंडियन्स भारी; रोहित शर्मा सामनावीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्णधार रोहित शर्मा (६२) आणि केरॉन पोलार्ड (४०) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ६ गड्यांनी मात केली. मुंबईचा पाच सामन्यांतील हा दुसरा विजय ठरला.

बंगळुरूने दिलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने १८ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात पार्थिव पटेल ५ धावा करून परतला. रोहित शर्माने ४४ चेंडंूत ४ चौकार आणि ३ षटकांर खेचत ६२ धावा ठोकल्या. अंबाती रायडूने ३१ आणि जोस बटलरने २८ धावांचे योगदान दिले. पोलार्डने तुफानी फलंदाजी करत १९ चेंडूंत ४० धावा कुटल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले. हार्दिक पांड्या २ धावांवर नाबाद राहिला. बंगळुरूकडून इक्बाल अब्दुल्लाने ३ बळी घेतले.

तत्पूर्वी, पाच फलंदाजांच्या छोट्या छोट्या खेळींच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ बाद १७० धावा काढल्या. बंगळुरूकडून विराट कोहली (३३), लोकेश राहुल (२३), ए. बी. डिव्हिलर्स (२८) आणि मधल्या फळीत सर्फराज खान (२८) तसेच ट्रेव्हिस हेड (३७) यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १७० धावांपर्यंत पोहोचवले.

पदार्पणाच्या सामन्यात ट्रेव्हिस हेडने शानदार फलंदाजी करत अवघ्या २४ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांच्या साहाय्याने ३७ धावांची खेळी केली. त्याने सर्फराजसोबत ५.४ षटकांत ६३ धावा ठोकल्या. सर्फराजने १८ चेंडूंत २ षटकार, २ चौकारांसह २८ धावा केल्या.

अखेरच्या षटकांत ३ विकेट
बंगळुरूने १९ व्या षटकापर्यंत ५ बाद १६२ धावा काढल्या होत्या. मात्र, अखेरच्या षटकांत ३ गडी बाद झाले. हेड, सर्फराज, स्टुअर्ट बिन्नी बाद झाले. बुमराहने हॅट्िट्रकची संधी दवडली. बुमराहने ३१ धावांत ३ गडी बाद केले.
कोहलीच्या १८७ धावा
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या आयपीएल-९ मध्ये ३ सामन्यांत १८७ धावा झाल्या आहेत. त्याने २ अर्धशतके ठोकली. त्याने या धावा १४४.९६ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या. सर्वाधिक धावांत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातचा अॅरोन फिंच (३ सामने, १९१ धावा) आणि केकेआरचा गौतम गंभीर (४ सामने, २२६ धावा) सर्वात पुढे आहेत.
सनरायझर्स हैदराबादपुढे गुजरात लायन्सचे "चॅलेंज'
राजकोट - गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादपुढे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी स्पर्धेतील "अजेय' टीम गुजरात लायन्सचे आव्हान असेल. गुजरात लायन्सने स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत. गुजरातची टीम ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सनरायझर्सची टीम अजून खेळाडूंच्या हरवलेल्या फॉर्ममुळे संकटात आहे. सनरायझर्स गुणतालिकेत ४ सामन्यांत १ विजय, ३ पराभवांसह सहाव्या क्रमांकावर आहे. ही लढत जिंकून गुुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याचे गुजरात लायन्सचे लक्ष्य असेल.
पुढील स्‍लाइडवर वाचा, धावफलक... गुणतालिका