आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • MI Vs GL Live Score And Updates: Gujarat Lions Vs Mumbai Indians IPL 2017 Live Match 35

मुंबईने सुपर अाेव्हरमध्ये केली लायन्सची शिकार; सत्रात पहिला सामना टाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकाेट - सलगच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सने अायपीएल-१० मध्ये सुपर अाेव्हरमध्ये सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सचा पराभव केला. मुंबईने शनिवारी अटीतटीच्या सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. गाेलंदाज जसप्रीत बुमराह, पाेलार्ड अाणि बटलरने शानदार खेळी करताना मुंबईला सुपर अाेव्हरमध्ये विजय मिळवून दिला. यंदाच्या सत्रातील हा पहिलाच सामना टाय झाला. मुंबईचा लीगमधील हा सातवा विजय ठरला. दुसरीकडे गुजरातला सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लायन्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १५३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने ९ गडी राखून १५३ धावांची खेळी करताना सामना टाय केला. मात्र, त्यानंतर सरस खेळी करताना मुंबईने विजयश्री खेचून अाणली.  मुंबईकडून सलामीवीर पार्थिव पटेलने (७०) झंझावाती खेळी केली. धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला पार्थिव पटेल अाणि जाेस बटलरने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी ४३ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान अवघ्या ९ धावांची खेळी करून बटलर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर नितीश राणाने पार्थिवला माेलाची साथ दिली. या दाेघांनी ३९ धावांची भागीदारी करताना विजयाचा मार्ग सुकर केला.
 
रंगत सुपर ओव्हरची
मुंबई : फाॅकनरच्या चेंडूंवर पाेलार्ड (१० धावा, १ चाैकार व १ षटकार) व बटलरने (१) मुंबईला ११ धावा काढून दिल्या. 
गुजरात : बुमराहने पाच चेंडूंत ६ धावा देऊन फिंच व मॅक्लुमला लक्ष्य गाठण्यापासून राेखले. गुजराने ५ चेंडूंत ६ धावा काढल्या.

धावफलक
गुजरात लायन्स     धावा     चेंडू     ४    ६ 
इशान झे. पाेलार्ड गाे. हरभजन    ४८    ३५    ०६    २
मॅक्लुम त्रि.गाे. लसिथ मलिंगा    ०६    ०४    ०१    ०
रैना झे. पाेलार्ड गाे. बुमराह    ०१    ०३    ००    ०
फिंच त्रि.गाे. लसिथ मलिंगा    ००    ०३    ००    ०
कार्तिक झे. पटेल गाे. कृणाल    ०२    ०८    ००    ०
जडेजा झे. गाे. कृणाल    २८    २१    ०२    ०
फाॅकनर त्रि.गाे. बुमराह    २१    २७    ०२    ०
इरफान झे. हार्दिक गाे. कृणाल ०२    ०३    ००    ०
टाय धावबाद (बुमराह)    २५    १२    ०२    २
बासिल थम्पी नाबाद    ०२    ०४    ००    ०
अंकित साेनी नाबाद    ०७    ०२    ००    १
अवांतर : ११.एकूण : २० षटकांत ९ बाद १५३ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२१, २-४६, ३-४८, ४-५६, ५-८३, ६-९५, ७-१०१, ८-१४४, ९-१४४. गाेलंदाजी : मॅक्लीनघन ४-०-५०-०, लसिथ मलिंगा ४-०-५३-२, हरभजन सिंग ४-०-२३-१, जसप्रीत बुमराह ४-०-३२-२, कृणाल पंड्या ४-०-१४-३.  
मुंबई इंडियन्स    धावा     चेंडू     ४    ६ 
पार्थिव झे. कार्तिक गो. फॉकनर     ७०    ४४    ०९    १
जाेस बटलर धावबाद (फाॅकनर)     ०९    ०७    ०२    ०
नितीश पायचीत गो. अंकित साेनी     १९    १६    ०१    १
राेहित झे. कार्तिक गो. फॉकनर     ०५    १३    ००    ०
पोलार्ड झे. मॅक्लुम गाे. थम्पी    १५    ११    ०२    ०    
कृणाल पंड्या धावबाद (जडेजा)    २९    २०    ०२    ०
हार्दिक झे. इशान गाे. थम्पी    ०४    ०५    ००    ०
हरभजन पायचीत थम्पी    ००    ०१    ००    ०
मॅक्लीनघन धावबाद (इरफान)    ०१    ०१    ००    ०
बुमराह धावबाद (जडेजा)    ००    ०१    ००    ०
लसिथ मलिंगा नाबाद     ००    ०१    ००    ०
अवांतर : १. एकूण : २० षटकांत सर्वबाद १५३ धावा. गडी बाद क्रम : १-४३, २-८२, ३-१०४, ४-१०९, ५-१२७, ६-१३९, ७-१४२, ८-१४३, ९-१५०, १०-१५३. गोलंदाजी : थंम्पी ४-०-२९-३, फॉकनर ४-०-३४-२, इरफान २-०-३६-०, अंकित सोनी ४-०-१६-१, सुरेश रैना ४-०-२८-०, टाय १-०-९-१, जडेजा १-०-११-०.
 
बातम्या आणखी आहेत...