आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Clarke Comented On Ex Australian Coach Buchanan, Matthew Hayden, And Symonds

क्लार्कची टिका- म्हणे, बुकानन नव्हे, कुत्राही काेच असता तरी चॅम्प राहिलो असताे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- अाॅस्ट्रेलिया टीमचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने नवे पुस्तक लिहून क्रिकेटच्या विश्वात खळबळ उडवून दिली. त्याने नुकतेच ‘अॅशेस डायरी २०१५’ नावाचे पुस्तक लिहिले अाहे.
‘अाॅस्ट्रेलिया संघ इतका सशक्त हाेता की, माझा कुत्रा ‘जेरी’ हा टीमचा प्रशिक्षक राहिला असता, तरी अाम्ही क्रिकेटच्या विश्वातील बादशहा राहिलाे असताे,’ असा गाैप्यस्फाेट त्याने या पुस्तकातून केला. या वेळी त्याने सहकारी मॅथ्यू हेडन अाणि सायमंडवर जाेरदार टीका केली. अॅॅशेस मालिकेतील पराभवानंतर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्याने सर्वांवर ताेंडसुख घेतले.

‘बुकाननने कधीही देशाचे प्रतिनिधित्व केले नाही. त्यामुळे अांतरराष्ट्रीय क्रिकेटला ताे कसे समजू शकताे,’ असेही क्लार्क पुस्तकात म्हणाला. १२ वर्षांपर्यंत मी देशाचे प्रतिनिधित्व केले. मी अापले सर्वस्व या खेळाला समर्पित केले. रिकी पाँटिंगचा मी फार अादर करत हाेताे. कर्णधाराच्या भूमिकेत त्याचे देशासाठी महत्त्वाचे याेगदार राहिले अाहे. त्यामुळे पाँटिंग म्हणाला असता तर ब्रिजवरून खाली उडी मारली असती, असेही ताे म्हणाला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, क्लार्क काय म्हणाला हेडन आणि सायमंडच्या बाबतीत.... कोण करायचे दारू पिऊन बॅटिंग...