आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Clarke\'s Wife Kyly Cries During His Retirement Speech

PHOTOS: क्लार्कचे मनोगत एेकून पत्‍नीच्‍या भावना अनावर, सारेच झाले भावूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लार्क आणि पत्नी कायली. - Divya Marathi
क्लार्क आणि पत्नी कायली.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघाचा कर्णधार मायकल क्लार्क याने अॅशेज मालिकेनंतर सन्‍यास घेण्‍याची घोषणा केली होती. चौथी कसोटी आणि मालिका गमावल्‍यानंतर त्‍याने ही घोषणा केली आहे. क्रिकेटमधून निवृत्‍त होतानाचे भावनिक क्षण पाहून त्‍याची पत्‍नीही अश्रुंना थांबवू शकली नाही.
भाषणादरम्‍यान पापण्‍या पाणावल्‍या
क्‍लार्कचे निवृत्‍तीचे भाषण ऐकताना त्‍याची पत्‍नी कायली हिच्‍या पापण्‍या पाणावल्‍या. ती अत्‍यंत भावनिक झाली होती. कायलीने एक फोटो इंस्‍टाग्रामवर शेअर करून लिहीले, "मला माझ्या पतीवर गर्व आहे. ते ऑस्‍टेलियाचे सर्वश्रेष्‍ठ खेळाडूंमध्‍ये आहेत.' कायलीने 8 जुलैला ट्विटरव्‍दारे सांगितले होते की, ती आई बनणार आहे.

क्लार्क खेळणार शेवटची टेस्‍ट
34 वर्षीय क्लार्क म्‍हणाला, ‘ निवृत्‍तीसाठी ही योग्‍य वेळ आहे. माझ्याजवळ आणखी एक टेस्‍ट मॅच आहे. ही माझ्या करियरमधील शेवटची मॅच असणार आहे. त्‍यानंतर मी निवृत्‍त होणार आहे. कोणालाही खेळ सोडावा वाटत नसतो. पण माझ्या कामगिरीमुहे मी असमाधानी आहे. ' 20 तारखेपासून सुरू होणारी पाचवी अॅशेज टेस्‍ट क्‍लार्कसाठी शेवटची मॅच असणार आहे.
अॅशेजमध्‍ये फ्लॉप
क्लार्क अॅशेज मालिकेमध्‍ये फ्लॉप ठरला आहे. त्‍याने चार मॅचमध्‍ये 117 धावा बनवल्‍या आहेत. वनडे इंटरनॅशनल आणि टी-20 क्रिकेटमधून त्‍याने आधीच निवृत्‍ती घेतली आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, कायली क्‍लार्कसह मैदानावरील भावनिक क्षणांचे फोटो..