आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक टीमला मिळाला काेच; मिकी अाॅर्थरची नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - मागील महिनाभरापासून राष्ट्रीय टीमसाठी प्रशिक्षकाच्या शाेधात असलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शुक्रवारी सुटकेचा नि:श्वास साेडला. कारण महिनाभराची प्रशिक्षकाची शाेधमाेहीम अखेर फत्ते झाली अाहे. दक्षिण अाफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू मिकी अाॅर्थर यांनी पाकच्या राष्ट्रीय टीमसाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावण्यास हाेकार दिला अाहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात अाली. पीसीबीने अाॅर्थरला राष्ट्रीय टीमला प्रशिक्षण देण्याची विनवणी केली. त्यासाठीचा प्रस्तावही दाखल केला. अाॅर्थरने प्रशिक्षकासाठी राजी असल्याचे सांगितले. गत २००५ ते २०१० पर्यंत अाॅर्थर यांनी अाफ्रिकन टीमला प्रशिक्षण दिले. मागील अाठवड्यात इंग्लंडचे पीटर मुर्स अाणि अाॅस्ट्रेलियाच्या स्टुअर्ट लाॅने नकार दर्शवला हाेता.
बातम्या आणखी आहेत...