आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली ‘निराश’ आहे -जॉन्सन; तिसऱ्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचे शाब्दिक वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य करताना शाब्दिक वार केले आहेत. भारताचा कर्णधार कोहली “निराश’ असल्याचे म्हणत जॉन्सनने त्याला आक्रमकता नियंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे. तिसऱ्या कसोटीला रांची येथे येत्या १६ मार्चपासून सुरुवात होत आहे. सध्या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत अाहेत. तिसऱ्या कसोटीपूर्वी शाब्दिक वार करून भारतीय खेेळाडूंना दबावात आणण्याचे प्रयत्न ऑस्ट्रेलियाकडून होत आहेत. जॉन्सनची कोहलीवरील प्रतिक्रिया त्यातीलच एक भाग आहे. मिशेल जॉन्सनचा कोहलीसोबत आधीसुद्धा वाद रंगला होता.  
 
भारतीय कर्णधाराची फिरकी घेताना जॉन्सन म्हणाला, “कोहली “निराश’ आहे. तो धावा काढण्यात अपयशी ठरत अाहे. यामुळे त्याच्यावरील दबाव आणि त्याची निराशा वाढली आहे. भारतीय कर्णधाराने आपली नाहक आक्रमकता नियंत्रित करण्याची गरज आहे.’ फॉक्सस्पोर्ट््स डॉटकॉमएयूमध्ये आपल्या कॉलममध्ये जॉन्सन म्हणाला, “कोहली खूप आक्रमक आहे. मात्र, धावा निघत नसल्यामुळे तो या मालिकेत निराश आहे. तो आपल्या भावनांना व्यक्त करून आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर कोहलीची भावना बदललेली दिसली. निराशेमुळेच कोहली विविध वादांत पडत आहे,’ असेही त्याने म्हटले.  

जॉन्सन आणि कोहली एकमेकांसमोर आले तेव्हा बरेचदा वाद रंगला आहे. २०१४ मध्ये मेलबर्न येथे  बॉक्सिंग डे कसोटीच्या वेळी कोहलीने जॉन्सनच्या एका चेंडूवर जोरदार डिफेन्स केला होता, तेव्हा जॉन्सनने रागाच्या भरात चेंेडू उचलून स्टम्पकडे फेकला. त्याने तो चेंडू कोहलीच्या पाठीवर थ्रो केला. त्या सामन्यात कोहलीने १६९ धावा ठोकल्या. सामना संपल्यानंतर कोहलीने जॉन्सनवर विरोधी खेळाडूचा सन्मान करत नसल्याचा आरोप केला होता.

दोन्ही संघाचे खेळाडू आज रांचीत पोहोचणार, तिसरी कसोटी १६ ते २० मार्चदरम्यान रांचीत
जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ सोमवारी रांचीत पोहोचतील. १६ ते २० मार्चदरम्यान रांची शहर क्रिकेटच्या रंगात रंगेल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ ने बरोबरीत आहेत.  ऑस्ट्रेलिया संघ आणि भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ १३ मार्च रोजी ११.३० वाजता रांचीत पोहोचतील, तर टीम इंडियाचे खेळाडू वेगवेगळ्या विमानाने पोहोचतील.    भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ १४ आणि १५ मार्च रोजी जेएससीए स्टेडियमवर सराव करतील. विराट कोहली जेएससीए स्टेडियमवर दुसऱ्यांदा कर्णधारपद भूषवण्यासाठी उतरेल. 

मालिकेतील टॉप गोलंदाज 
१. आर. अश्विन १५ विकेट  
२. स्टीव्ह ओकिफे१५ विकेट  
३. नॅथन लॉयन१३ विकेट  
४. रवींद्र जडेजा१२ विकेट.  

मालिकेतील टॉप फलंदाज   
१. लोकेश राहुल २१५ धावा, ३ अर्धशतके
२. स्टीव्ह स्मिथ १७२ धावा, १ शतक  
३. रेनशॉ १६४ धावा, २ अर्धशतके  
४. चेतेश्वर पुजारा १४६ धावा, १ अर्धशतक  
५. अजिंक्य रहाणे १०० धावा, १ अर्धशतक

मालिकेत आतापर्यंत
- ०१ शतक
- ०९ अर्धशतके
- १५४ चौकार
- १४ षटकार
बातम्या आणखी आहेत...