आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या इंडियन अॅक्ट्रेसने केले आफ्रिदीला किस, आता दिसू शकते बिग बॉस-9 मध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडल आणि एक्ट्रेस अर्शी खान. - Divya Marathi
मॉडल आणि एक्ट्रेस अर्शी खान.
सध्या शाहिद आफ्रिदी, बिगबॉस-9 मध्ये येण्याची शक्यता असलेली मॉडेल तथा, साउथ इंडियन अॅक्ट्रेसच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे. या प्रेम प्रकरणामुळे तो पुन्हा एकदा माध्यमांत चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे दुबईत एंजॉय करतानाही दिसून आले. हे तेथे एका हॉटेनमध्ये थांबले होते.

बिग बॉस 9 मध्ये अर्शी!
रियालिटी शो बिग बॉसच्या सीजन 9 ची सुरूवात लवकरच होत आहे. बिग बॉसमध्ये सामिल होणार्‍या स्पर्धकांच्या नावाची यादीही जाहिर झाली आहे. त्यात एक नाव आहे ते एक्ट्रेस अर्शी खानचे. त्यामुळे ती आता रियालिटी शोमध्येही दिसण्याची शक्यता आहे. अर्शी साउथ इंडियन सिनेमांची अॅक्ट्रेस आहे. काही दिवसांपूर्वी ती हैद्राबादेत एका तेलुगु सिनेमाच्या शूटिंगमध्येही व्यस्त होती.

आफ्रिदीला केले होते किस
अर्शीने स्वतःच आफ्रिदीला किस केल्याचे वेबसाइटवर मान्य केले होते. त्यांच्या प्रेम प्रकरणाच्या बाबतीत तिला विचारले असता, तिने गोलमोल उत्तरे दिली होती. मात्र आता जेव्हा शाहिद आफ्रिदीच या वृत्तावर भडकला आहे. तर, अर्शीनेही ट्वीट करून या अफेअरची बातमी फेटाळली.

मिळालेल्या माहिती नुसार अर्शी आणि आफ्रिदी हे फोनवर नेहमी संपर्कात असतात. मात्र दुसरीकडे आफ्रिदी या मुद्यावर भडकला असून त्याने भारतीय माध्यममानाच दोष द्यायला सुरूवात केली. तो म्हणतो, भारतीय माध्यमे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळेच भारतीय माध्यमांवर पाकिस्तानी चॅनलस् आणि क्रिकेटर्स विश्वास ठेवत नाही. त्यांच्या अफेअरची बातमीही खोटी असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आफ्रिदीचे लग्न झाले असून, त्याला चार मुली आहेत. अर्शी मुळची अफगानी असून, ती 4 वर्षांची असतानाच तिचे कुटुंब अफगानिस्तानमधून भोपाळला आले.

अर्शीचे ट्वीटः
पहिले ट्वीट : "मी आफ्रिदीला डेट करत नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. मित्राप्रमाणेच भेटतो आणि काही वेळ घालवतो."
दुसरे ट्वीट : "शाहिद, हे माध्यमांमध्ये काय सुरू आहे? मी तर आफ्रिदीची फार मोठी फॅन आहे. मात्र माध्यमे आपल्य अफेअरच्या गोष्टी करत आहे."
पुढील स्लाइड्सवर पाहा, अर्शी खानचे खास फोटो...