आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लग्नं-दोन अफेयर्स, मुलाचा अपघातात मृत्यू, अशी आहे या क्रिकेटरची Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन पहिली पत्नी नौरीन (लेफ्ट) आणि दुसरी पत्नी संगीता बिजलानीसोबत. अझरने दोघींना घटस्फोट दिला आहे. - Divya Marathi
टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन पहिली पत्नी नौरीन (लेफ्ट) आणि दुसरी पत्नी संगीता बिजलानीसोबत. अझरने दोघींना घटस्फोट दिला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनने नुकतेच माजी कोच अनिल कुंबळेंबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अझरने कुंबळेंच्या हेड कोच पदाचा दिलेल्या राजीनाम्याचे समर्थन केले आहे. तसेच अझरने रवी शास्त्रींनी केलेले वक्तव्य बेजबाबदारीचे असल्याचे म्हटले आहे. भारताची सध्याचा संघ असे यश मिळवत आहे जे गेल्या 20 वर्षात टीम इंडियाला जमले नव्हते असे वादग्रस्त वक्तव्य रवी शास्त्रींनी विराट अॅंड कंपनीबाबत केले होते. अझरची झाली दोन लग्नं...
 
- भारतीय टीमचा सर्वात दुसरा यशस्वी कर्णधार राहिलेल्या मोहम्मद अजहरुद्दीनचे पर्सनल लाईफ खूपच वादग्रस्त राहिले. त्याने दोन लग्नं केली आणि दोन्ही अयशस्वी ठरली. 
- अझरचे पहिले लग्न वर्ष 1987 मध्ये नौरीन खानसोबत झाले होते. जिच्यापासून अझरला दोन मुले झाली. हे लग्न सुमारे 9 वर्षे टिकले.
- बॉलिवूड अॅक्ट्रेस संगीता बिजलानी अझरच्या आयुष्यात आल्यानंतर पहिली पत्नीला त्याने 1996 मध्ये डिवोर्स दिला. 
- नौरीनला घटस्फोट दिल्यानंतर अझरने संगीता बिजलानीसोबत दुसरे लग्न केले. हे लग्न 14 वर्षे राहिले. वर्ष 2010 मध्ये अझरने बिजलानी ला सुद्धा घटस्फोट दिला.
- बिजलानीशी घटस्फोट झाल्यानंतर अझरचे स्टार बॅडमिंटन प्लेयर ज्वाला गुट्टासोबत अफेयर असल्याची चर्चा झाली. मात्र, लवकरच दोघांत ब्रेकअप झाले. 
- यानंतर अझरचे नाव एक अमेरिकन महिला शेनन मेरीसोबत जोडले गेले. वर्ष 2015 मध्ये त्यांच्या लग्नाचे वृत्त आले व नंतर ते चुकीचे ठरले. 
 
असे राहिले क्रिकेट करियर-
 
- अझर भारताचा धोनीनंतर सर्वात यशस्वी वन डे कर्णधार आहे. त्याने कसोटी करियरमध्ये 99 मॅच खेळल्या तर वनडे करियरमध्ये 334 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.
- टेस्ट करियरमध्ये त्याने 6215 धावा केल्या तर वनडेत त्याच्या नावावर 9378 धावा आहेत. वनडेत अझरच्या नावावर 12 विकेट सुद्धा आहेत.
- टेस्ट करियरमध्ये त्याचा हायस्ट स्कोर 199 आहे तर वनडेत नाबाद 153 धावा असा राहिला.  
- अझरच्या नावावर डेब्यूनंतर सलग तीन सामन्यात तीन शतके ठोकण्याचा वर्ल्ड रिकॉर्ड सुद्धा आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, अझरच्या मुलाचा कसा झाला होता मृत्यू आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...