आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशहिताला प्राधान्य दिल्याने मोहम्मद शमीला BCCI कडून 2.23 कोटींची बक्षिसी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील मुस्लिम गरीब परिवारात जन्मलेला शमी भारताचा उगवता तारा म्हणून ओळखला जातो. - Divya Marathi
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील मुस्लिम गरीब परिवारात जन्मलेला शमी भारताचा उगवता तारा म्हणून ओळखला जातो.
स्पोर्टस डेस्क- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने 2 कोटी 23 लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली आहे. आयपीएलच्या 8 व्या हंगामात खेळता न आल्याने त्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसीआयने शमीला 2 कोटी 23 लाख 12 हजार 500 रूपये इतकी भरपाई रक्कम दिली आहे. अर्थात त्याने देशहिताला प्राधान्य दिल्याने बीसीसीआयने एकप्रकारे त्याला बक्षिसीच दिल्याचे मानले जात आहे.
गेल्या वर्षी (2015) फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूंझीलंडमध्ये विश्वचषक स्पर्धा झाली. यात स्पर्धेत गुडघ्याची दुखापती असूनही मोहम्मद शमी भारतीय संघात सहभागी झाला होता. तसेच त्याआधी ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेतही तो खेळला होता. मात्र, शमीला 2015 मध्ये झालेल्या आयपीएलच्या आठव्या हंगामाला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले होते.

बीसीसीआयने केला त्याचा विचार-
- विश्वकरंडक स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे दुखापत असतानाही शमीने देशासाठी खेळणे पसंत केले.
- त्याचवेळी व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळत असलेल्या दिल्ली संघाकडून तो खेळला नाही. त्याने दुखापतीमुळे माघार घेतली.
- तो दिल्ली संघाकडून न खेळल्याने त्याचे 2.23 कोटींचे नुकसान झाले.
- दिल्ली संघ व्यवस्थापनाने त्याला 2015 मध्ये एकही रूपया दिला नाही.
- त्याचवेळी मोहम्मद शमीने विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पोहचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात टिपले 17 बळी-
- गुडघ्याला दुखापत असतानाही त्याने विश्वकरंडकाच्या 5 सामन्यात तब्बल 17 विकेट घेतल्या होत्या.
- त्यानंतर आयपीएलच्या आठव्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेत त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली.
- त्यानंतर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. आता तो वेस्ट इंडिज दौ-यावर गेला आहे.
- शमीच्या या देशप्रेमी निर्णयामुळे बीसीसीआयने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला.
- अखेर बीसीआयने आयपीएल 2015 मध्ये दुखापतीमुळे न खेळल्याने मोहम्मद शमीला एकूण 2 कोटी, 23 लाख 12 हजार 500 रुपयांची भरपाई दिली आहे.
पुढे स्लाईडसद्वारे वाचा, मोहम्मद शमीबाबत काही फॅक्टस....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...