आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादविवाद विसरून धोनी पत्नी साक्षीसह पोहचला युवीच्या रिसेप्शनला, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनी पत्नी साक्षीसह युवी-हेजलच्या रिसेप्शनमध्ये. यावेळी युवीची आई शबनम उपस्थित होत्या. - Divya Marathi
धोनी पत्नी साक्षीसह युवी-हेजलच्या रिसेप्शनमध्ये. यावेळी युवीची आई शबनम उपस्थित होत्या.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी युवी आणि त्याच्यातील जुने वाद विसरून त्याच्या दिल्लीतील रिसेप्शनमध्ये पोहचला होता. धोनी पत्नी साक्षीसमवेत दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये पोहचला तशा सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. स्वत: युवराजने स्टेजवरून धोनीला पाहिले तसे त्याच्या चेह-यावर हलकीशी स्माईलने सर्व काही सांगितले.
आपल्याला माहित असेलच की, युवराजला टीम इंडियातून वगळल्यानंतर युवीचे पिता योगराज सिंग यांनी धोनीला लक्ष्य केले होते. धोनी माझ्या मुलावर अन्याय करतोय, तो भीक भीक मागत फिरेल असे वादग्रस्त वक्तव्य योगराज यांनी धोनीबाबत केले होते. त्यानंतर खास मित्र असलेले युवी-धोनीत अंतर पडत गेले होते. मात्र, धोनी आणि युवी यांनी याबाबत अतिशय परिपक्वता दाखवत काहीच घडले नाही असे वर्तन ठेवले होते. अखेर धोनीही युवीच्या रिसेप्शनला पोहचला आणि त्याने युवीसह सा-या फॅन्सला खूष केले....
- धोनीने ग्रे कलरचा सिंपल सूट घातला होता तर साक्षीने गोल्डन कलरचा सूट घातला होता.
- धोनी आणि साक्षी हॉटेलात पोहचताच थोडी खळबळ माजली.
- तेथे आधीच असलेल्या मोहम्मद कैफ सर्वात आधी धोनीजवळ गेला व त्यांच्याशी हस्तांदोलन केले.
- धोनीने स्टेजवर पोहचून युवी आणि हेजलला एक गिफ्ट दिले. युवीने ते स्वत: स्टेजच्या मागे ठेवले व धोनीसमवेत फोटो काढला.
- यावेळी युवीची आई शबनमही उपस्थित होती. यावेळी पाहुण्यांनी हा क्षण टिपण्यासाठी मोबाईल कॅमेरे ऑन केले.
पुढे PHOTOSद्वारे पाहा, जेव्हा धोनी पत्नी साक्षीसह रिसेप्शनमध्ये पोहचला....
बातम्या आणखी आहेत...