मुंबई- भारतीय वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत मिळून अमेरिकेत झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील उशिराबाबत आयसीसीकडे तक्रार केली आहे.
अमेरिकेत भारत-वेस्ट इंडीज दुसरा सामना तांत्रिक कारणांमुळे ५० मिनिटे उशिरा सुरू झाला होता. नंतर हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. या सामन्यात भारताने विंडीजला १४६ धावांत गंुडाळले होते. तरीही षटकांनंतर सामना सुरू करण्यात आला नव्हता. डकवर्थ लुईस नियमाने निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांचा षटकांचा खेळ गरजेचे असते. धोनीच्या मते सामना वेळेवर सुरू झाला असता तर फलंदाजी मिळाली असती निकाल भारताच्या बाजूने लागला असता. यामुळे ही मालिका बरोबरीत सुटू शकली असती. स्टार स्पोर्ट्््सला फीड देणारे प्रॉडक्शन हाऊस ‘सनसेट अँड वाइन’कडून झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रसारण होत नव्हते.