आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni Gave Cheeky Reply To Former English Cricketer Over Comment On His Bikes

इंग्‍लंडच्‍या क्रिकेटरची धोनीच्‍या बाईकवर कमेंट, धोनीच्‍या उत्‍तराने बोलती झाली बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीने हार्ले डेविडसन बाइकचा फोटो शेयर केला. - Divya Marathi
धोनीने हार्ले डेविडसन बाइकचा फोटो शेयर केला.
क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर इंग्‍लंडचा माजी गोलंदाज डॅरेन गॉफ याचा चांगलाच समाचार घेतला आहे. धोनीचे उत्‍तर झोंबल्‍याने गॉफची बोलतीच बंद झाली आहे. नेमके असे झाले काय, तर धोनीने ट्विटरवर त्‍याच्‍या दोन जुन्‍या सिलेंडर बाइकचे फाेटो शेयर केले होते. त्‍याने चाहत्‍यांना विचारले होते की या बाईक्‍सना मी आणखी सुधारू इच्‍छित आहे. त्‍यावर गॉफने धोनीची मस्‍करी करण्‍यासाठी त्‍याच्‍या डुकाटी बाइकचा फोटो शेयर केला.
धोनीने काय दिले उत्‍तर
डेरेन गॉफने डुकाटी बाइकचा फोटो शेयर करून लिहीले की, ‘एम.एस. धोनी तुझी बाईक यापेक्षा चांगली नाही.’ गॉफने धोनीच्‍या जुन्‍या बाइक्‍सची तुलना त्‍याच्‍या बाईक्‍ससोबत केली. त्‍यानंतर धोनीने ही त्‍याच्‍या हार्ले डेविडसन बाइकचा फोटो शेयर केला. त्‍याने लिहीले की, “तू बरोबर आहेस गॉफ. यापेक्षा (हार्ले डेविडसन) चांगली बाईक नाही.”
चाहत्‍यांना गॉफच्‍या उत्‍तराची प्रतीक्षा
त्‍यानंतर धाेनीच्‍या चाहत्‍यांनी डेरेनच्‍या उत्‍तराची वाट पाहिली. त्‍याने उत्‍तर दिले की, “यामध्‍ये जवळचा संबंध आहे. डुकाटी vs हार्ले डेविडसन.” पुढे धोनीनेही ट्विट केले नाही. यावरून पुन्‍हा एकदा धोनीचे बाईकप्रेम समोर आले आहे.