आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni Is Suffering From Back Spasms, Nehra Has His Own Training Programme

भारत-पाक प्लेयर्सची बोललेच नाही, आफ्रिदी म्हणाला-पहिल्या 6 ओव्हर्स असतील वेगवान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरावादरम्यान शाहिद अफ्रिदी आणि युवराजसिंग. - Divya Marathi
सरावादरम्यान शाहिद अफ्रिदी आणि युवराजसिंग.
फतुल्लाह- आज येथे होणाऱ्या भारत-पाक सामन्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी दोन्ही संघांनी एकाच स्टेडिअमवर कसून सराव केला. या स्टेडिअममध्ये जवळ-जवळच असलेल्या नेट्समध्ये दोन्ही संघ एकाच वेळी सराव करताना दिसले. असे असले तरी या दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांबरोबर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. पाकिस्तान संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीचा भारताविरुद्ध होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी वेगवान गोलंदाजांवर भर असण्याची शक्यता आहे. तो म्हणाला की, बांगलादेशमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळत आहे. आम्ही चार वेगवान गोलंदाजांसह मैदानावर उतरणार आहोत. आमचे वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या 6 ओव्हर्समध्ये इंडिअन बॅटिंग अॅटॅकला तोडन्याचे काम करतील.

धोनी आणि नेहराने का केला नाही नेटवर सराव...
- धोनी पीठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. तो दुखापतीने त्रस्त असतानाही बांग्लादेशविरुद्ध खेळला होता.
- त्याला फीट होण्यासाठी आरामाची आवश्यकता आहे. यामुळे संघ व्यवस्थापणाने त्याला मैदानापासून 48 तास दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्याला कव्हर करण्यासाठी बांग्लादेशदोऱ्यावर गेलेल्या पार्थिव पटेलने ट्रेनिंग सेशनदरम्यान सराव केला.
- तर, नेहराला बांगलादेशविरुद्ध खेळताना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सरावापासून दूर ठेवण्यात आले.
- खरे तर, नेहरासाठी स्वतंत्र सरावाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
दोन्ही देशांचे खेळाडू असे राहिले एक मेकांपासून दूर
- भारत-पाक खेळाडूंनी एकाच वेळी सराव केला, मात्र खेळाडूंनी एकमेकांशी संभाषण केले नाही.
- दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मेन स्टेडिअमवर साधारणपणे चार ते साडे सहा दरम्यान सराव केला.
- स्टेडिअमवर चार खेळपट्ट्या सरावासाठी आहेत. या पैकी, पहिल्या दोनवर भारतीय तर दुसऱ्या दोन खेळपट्ट्यांवर पाकिस्तान संघाचे खेळाडू सराव करत होते.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...