आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 मिमीपेक्षा जाड बॅटवर बंदी; वॉर्नर, पोलार्ड, गेल, धोनीची पंचाईत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- गेल्या मार्च महिन्यात मेरिलबोर्न क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसीने केलेल्या सूचनेनुसार, फलंदाजांना यापुढे 40 मिमीपेक्षा जास्त जाडीची बॅट वापरता येणार नाही. एमसीसीने सूचवलेले नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. दरम्यान, 40 मिमीपेक्षा जास्त जाडीची बॅट वापरणारे डेव्हिड वॉर्नर, किरर्न पोलार्ड, ख्रिस गेल, महेंद्रसिंग धोनी यासारख्या तगड्या फलंदाजांची मात्र या नियमामुळे पंचाईत होणार आहे. हे फलंदाज 45 ते 50 मिमी जाडीची बॅट सध्या वापरतात.
 
फॅब फोरला नाही पडत फरक-
 
सध्याच्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फॅब फोर फलंदाज म्हणजेच विराट कोहली, ज्यो रूट, स्टीव्हन स्सिथ आणि केन विल्यमसन यांच्या बॅटची जाडी 40 मिमीपेक्षा कमी आहे. सोबतच 360 डिग्री एंगलमध्ये खेळणारा एबी डिव्हिलर्स हा सुद्धा 40 मिमीपेक्षा कमी जाडीची बॅट वापरतो. त्यामुळे या ताज्या दमाच्या फलंदाजांना याचा फरक पडणार नाही. मात्र, गेल, धोनी, पोलार्ड व वॉर्नरसारखे ताकदीचे व मोठे फटके खेळणा-या फलंदाजांना या नियमाचा फटका बसणार आहे.
 
बॅट जेवढी जाड तेवढा फटका ताकदीचा-
 
बॅट जेवढी जाड तेवढा फटका ताकदीचा व जोराचा बसतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांचा चेंडू अशा जाड बॅटला चाटून किंवा अगदी एज लागून गेला तरी तत्काळ सीमापार होतो. त्यामुळे यासाठीही सर्वसमावेशक नियम असावा अशी सूचना मेरिलबोर्न क्रिकेट क्लब (एमसीसीने) मार्च महिन्यात आयसीसीच्या समितीकडे केली होती. आयसीसीने ती मान्य करत याची अंमलबजावणी येत्या 1 ऑक्टोबरपासून करण्याचे मान्य केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...