आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: सामना संपल्यानंतर जेव्हा धोनीने गेल समोर जोडले हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला तीन विकेटने पराभूत करत आयपीएलच्या फायनलमध्ये सहाव्यांदा आपले स्थान पक्के केले आहे. शुक्रवारी रांचीमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईसमोर सर्वात मोठे आव्हान ख्रिस गेलचे होते. चेन्नईच्या गोलंदाजांनी मात्र गेलला अक्षरशः जखडून ठेवले. 43 चेंडूंचा सामना केलेल्या गेलने सामन्यात 93.34 च्या सरासरीने 41 धावा केल्या.
स्ट्राइक रेट 100 पेक्षा कमी
गेलचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा कमी राहाण्याचा योग दुर्मिळ असतो. रांची येथील सामन्यात 43 चेडूंचा त्याने सामना केला पण तो त्याच्या नैसर्गिक फॉर्ममध्ये परतलाच नाही. यात चेन्नईच्या गोलंदाजांचे मोठे योगदान राहिले. गोलंदाजांनी गेलला सुट मिळू दिली नाही त्यामुळे बंगळुरुचा स्कोअर 139 वरच थांबला.
गेलने चेन्नईच्या खेळाडूंसोबत केली मस्ती
सामना संपल्यानंतर प्रेझंटेशनच्या आधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ख्रिस गेलजवळ जाऊन त्याच्यासमोर हात जोडले. त्यावर गेलने त्याला दिलखुलास हसून दाद दिली. हे दृष्य पाहिल्यानंतर स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर धोनी गेलला घेऊन त्याच्या सहकारी खेळाडूंकडे गेला. तिथे गेलने सर्वांसोबत मस्ती केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चेन्नईच्या खेळाडूंसोबत मस्ती करतान गेल