आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी 4 महिने क्रिकेटपासून राहाणार लांब, \'मुलगी ओळखत नसल्याने तिला वेळ देणार\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे (झिम्बाब्वे) - महेंद्रसिंह धोनीला त्याची 15 महिन्यांची मुलगी जीवा ओळखत नाही, असे तुम्हाला कोणी सांगितले तर खरे वाटणार नाही. मात्र हे सत्य आहे. याचा खुलासा स्वतः टीम इंडियाचा एक दिवसीय सामन्यांचा कर्णधार धोनीने केला आहे. झिम्बाब्वेला व्हाइटवॉश दिल्यानंतर आता धोनी पुढील चार महिने कुटुंबासोबत राहाणार आहे. ऑक्टोबरमध्ये तो न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.

तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेला क्लीन स्विप दिल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये धोनीने मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
- एका प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, 'बऱ्याच कालावधीनंतर मला निवांत वेळ मिळत आहे. मला शंका आहे की आता माझी मुलगी मला ओळखत असेल. पुढील चार महिने मी आता मुलगी आणि फॅमिलीसोबत राहाणार आहे.'
- धोनीची मुलगी जीवा आता 15 महिन्यांची झाली आहे.