आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • MSK Prasad Names Chairman Of Selectors In BCCI\'s Annual General Meeting

41 वर्षाचे MSK प्रसाद टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर; 6 टेस्ट, 17 वनडेचा अनुभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी यष्टीरक्षक, फलंदाज एमएसके प्रसाद - Divya Marathi
माजी यष्टीरक्षक, फलंदाज एमएसके प्रसाद
मुंबई- टीम इंडियाचा माजी विकेटकीपर मन्नावा श्रीकांत प्रसाद (एमएसके प्रसाद) यांची टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टरपदी निवड झाली आहे. त्यांनी भारताकडून 6 कसोटी आणि 17 वन डे खेळले आहेत. बुधवारी मुंबईत बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच अजय शिर्के यांना पुन्हा BCCI चे सचिवपदी दिली गेली आहे. इतर निवड समितीचे सदस्य कोण...
- प्रसाद यांच्यासह सिलेक्शन पॅनेलमध्ये आणखी चार सदस्यांचा प्रवेश झाला आहे. यात सरनदीप सिंग, जतिन परांजपे, देवांग गांधी आणि गगन खोडा यांचा समावेश आहे.
- मीटिंगमध्ये अजय शिर्के यांची बिनविरोध बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाली. त्यांनी जुलै, 2016 मध्ये अनुराग ठाकुर यांच्या जागेवर हे पद मिळाले होते.
- तेव्हा शशांक मनोहर यांच्या जागेवर अनुराग ठाकुर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवडले गेले होते. शशांक मनोहर यांची आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.

बीसीसीआयने ठेवल्या होत्या कठिण अटी...
- सीनियर टीमचे सिलेक्टर बनण्यासाठी बीसीसीआयने कडक अटी ठेवल्या होत्या.
- उमेदवाराचे वय 60 पेक्षा अधिक नसावे. तसेच त्याने 5 वर्षापूर्वीपेक्षा आधी क्रिकेट सोडलेले असावे.
- तसेच संबंधित व्यक्ती आयपीएल टीम, कोचिंग अॅकेडमी अथवा मीडिया हाऊसशी जोडलेला नसावा, अशा अटी होत्या.
नयन मोंगिया, व्यंकटेश प्रसादला मिळाली नाही संधी-
- माजी विकेटकीपर नयन मोंगियाने टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यत्वसाठी अर्ज केला होता.
- 40 कसोटी आणि 140 वन डे खेळलेला मोंगियाने बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनंतर हा अर्ज केला होता.
- 46 वर्षाचा मोंगिया चार वर्षापासून बडोदा क्रिकेट असोसिएशन (बीसीए) च्या सीनियर आणि जूनियर टीमचा सिलेक्टर आहे.
- तो लोकल टीमचा सिलेक्टर सुद्धा राहिला आहे. अनुभव गाठीशी असल्याने त्याचा दावा मजबूत मानला जात होता. मात्र त्याला संधी दिली गेली नाही.
- अर्ज केल्यानंतर मोंगिया म्हणाला होता की, “होय, मी नॅशनल सिलेक्टर बनू इच्छितो. मला या विषयातील खूप माहिती आहे.”
- माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनीही यासाठी अर्ज केला होता. मात्र, मोंगियाप्रमाणेच प्रसाद यांना डावलल्याचे दिसत आहे.
- बीसीसीआयने प्रथमच सीनियर, जूनियर आणि महिला संघाच्या निवडीसाठी सदस्यांसाठी जाहिरात दिली होती.

यांनाही बनायचे होते सिलेक्टर-
- 6 कसोटी आणि 23 वनडे खेळलेल्या माजी विकेटकीपर समीर दिघेने यासाठी अर्ज केला होता.
- दिघे पाच वर्ष बीसीसीआय अॅकेडमी सोबत जोडला गेला आहे. त्याने त्रिपुरा रणजी टीमला कोचिंग केले आहे. त्यामुळे कदाचित त्याला संधी दिली नसावी.
- 3 कसोटी आणि 10 वन डे खेळलेला लेफ्ट आर्म स्पिनर नीलेश कुलकर्णी आणि मुंबईचा माजी फास्ट बॉलर अभी कुरुविलाने सुद्धा अर्ज दाखल केले होते.
- यासोबतच राष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या शिशिर हट्टंगडी, शंतनु सुगवेकर, रॉबिन सिंग (ज्यूनियर) आणि प्रीतम गंधेने सुद्धा अर्ज केला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...