स्पोर्टस डेस्क - भारताचा जिगरबाज क्रिकेटपटू म्हणून ज्याला सर्व क्रिकेटविश्व ओळखते तो युवराज सिंह क्रिकेटशिवाय इतर खेळातही माहिर आहे. एवढेच काय त्याला लहानपणी क्रिकेटऐवजी दुसऱ्याच खेळाची आवड होती, पण त्याच्या वडिलांच्या आग्रहामुळे तो क्रिकेटकडे वळला, हे एेकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
‘अंडर-१४’ रोलर स्केटिंगचा चॅम्पियनही होता हा क्रिकेटर...
-यश, अपयश, आजार, यशस्वी पुनरागमन अशा सगळ्याच कसोट्यांवर ‘युवराज’ ठरलेला युवराज सिंग हा ‘अंडर-१४’ रोलर स्केटिंगचा चॅम्पियनही होता हे अनेकांना माहिती नाही. स्केटिंग हे त्याचे पहिले प्रेम. स्केटिंगबरोबरच त्याला टेनिसचीही आवड होती. दोन्ही खेळांत प्रवीण असतानाही युवराजला हायस्कूलच्या काळात क्रिकेटचे वेड लागले. गेल्या दीड दशकांपासून क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या युवराजच्या आयुष्यातील चढ-उतारांना पाहिले तर तो खरोखर ‘लढवय्या युवराज’ असल्याचा प्रत्यय येतो.
नुकताच खेळलाय 300 वा वनडे...
- चॅम्पियन ट्रॉफीतली बांगलादेशविरुद्धचा सेमीफायनल सामना त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३०० वा एकदिवसीय सामना होता.
-चंदिगडला १२ डिसेंबर १९८१ ला युवराजचा जन्म झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० वा सामना खेळून आज तो अझहर, सचिन, सौरव आणि राहुल द्रविडच्या पंक्तीत बसला आहे.
-लहानपणी युवराजला टेनिस आणि रोलर स्केटिंगची प्रचंड आवड होती, मात्र वडील योगराज युवराजला क्रिकेट खेळायला बळजबरीने घेऊन जात. तेथूनच त्याला क्रिकेटची आवड लागली आणि त्याने त्यात करिअर करण्याचे ठरवले. आजही आपल्या क्रिकेटच्या आवडीबाबत तो वडिलांचे आभार मानतो.
युवराजची महत्त्वाची कामगिरी
-२००७ मध्ये टी-२० विश्वचषकात त्याने इंग्लंडविरुद्ध सहा चेंडूंत सहा षटकार मारले होते.
-२००० मध्ये त्याची भारतीय संघात निवड झाली. आयसीसी नॉक-आऊट ट्रॉफीमध्ये केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी त्याची निवड झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ८२ चेंडूंत ८४ धावा करून सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त १२ चेंडूंत ५० धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा युवीचे आणखी काही फोटोज...