आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांना शिवसेनेच्या विजय पाटील यांचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या २०१५ ते २०१७ या दोन वर्षांसाठी होणाऱ्या निवडणुका राजकीय आखाडा बनल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख व विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे विजय पाटील यांनी थेट अध्यक्षपदासाठीच आव्हान दिले आहे. विजय पाटील यांना मतांचे बळ देण्यासाठी पुढे सरसावलेल्या शिवसेनेने खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक हे दोन मोहरे या निवडणुकीत उतरवले आहेत. शिवसेनेचे राज्याच्या सत्तेतील भागीदार भाजपने आपले मुंबईचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांना या निवडणुकीत उतरवले आहे. रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. अर्जांची छाननी उद्या होईल व प्रत्येक उमेदवाराची वैधता जाहीर करण्यात येईल. एका क्रिकेट संघटनेच्या दोन वर्षांसाठीचा कारभार हाकण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या क्रिकेटपटूंमध्ये भारताचे माजी कप्तान व माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर, माजी भारतीय कसोटीपटू प्रवीण अामरे, लालचंद राजपूत, अॅबी कुरुविला यांचा समावेश आहे. माजी रणजीपटूंपैकी दीपक जाधव, संजय पाटील हेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

आशिष शेलार यांनी अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवडणुकीत आपल्याला परवानगी दिल्याचे जाहीर करून उपाध्यक्षपदासाठी फॉर्म भरला. शिवसेना या सत्तेतील भागीदाराने विश्वासात घेतले असते, तर त्यांच्यासोबत राहिलो असतो, असे स्पष्टीकरणही शेलार यांनी दिले आहे. काँग्रेससोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्यामुळे मला महाडदळकर गटातर्फे निवडणुकीत उतरावे लागले, असेही शेलार यांनी सांगितले.
सत्ताधारी महाडदळकर गटाने प्रत्येक जागेसाठी एक याप्रमाणे आपल्या सर्व उमेदवारांचे अर्ज आज भरले. विजय पाटील यांनी आपल्या गटातर्फे अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. उपाध्यक्षपदासाठी लालचंद राजपूत, अॅबी कुरुविला, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक या चौघांचे अर्ज दोन जागांसाठी दाखल करण्यात आले आहेत. संयुक्त सचिवपदासाठीच्या दोन जागांसाठी उन्मेष खानविलकर, लालचंद राजपूत, संजय पाटील या तिघांचे अर्ज पाटील गटाने दाखल केले आहेत. कोशाध्यक्षपदासाठी मयंक खांडवाला यांचा अर्ज भरण्यात आला आहे.
कार्यकारिणींच्या ११ जागांसाठी प्रवीण अामरे, दीपक जाधव, संजय पाटील, सूरज समत, संगम लाड, राजन फातर्फेकर, जगदीश गवंडे, दाऊद पटेल, नदीम मेमन यांचे अर्ज भरण्यात आले आहेत.
बाळ महाडदळकर गटाचे उमेदवार
अध्यक्ष : शरद पवार.
उपाध्यक्ष : दिलीप वेंगसरकर, आशिष शेलार.
संयुक्त सचिव : रवी सावंत,
पी. व्ही. शेट्टी.
कोशाध्यक्ष : नितीन दलाल.

कार्यकारिणी सदस्य
विनोद देशपांडे, नवीन शेट्टी, अरविंद कदम, दीपक पाटील, अरमान मलिक, शहा आलम, श्रीकांत तिगडी, दीपक मुरकर, गणेश अय्यर, रमेश वाजगे, पंकज ठाकूर.
निवडणूक १७ जून रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची तारीख १४ जून असेल
बातम्या आणखी आहेत...