आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई टीमचा धावांचा पाऊस; न्यूझीलंडविरुद्ध घेतली अाघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रणजी चॅम्पियन मुंबई संघाने शनिवारी पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध तीनदिवसीय सराव सामन्यात दिल्लीच्या फिराेजशहा काेटला मैदानावर धावांचा पाऊस पाडला. मुंबई संघाने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ४३१ धावांची खेळी केली. यासह मुंबई संघाला १०७ धावांची अाघाडी मिळाली. अद्याप या टीमकडे पाच विकेट शिल्लक अाहेत. दिवसअखेर मुंबईचा युवा कर्णधार अादित्य तरे (५३) अाणि सिद्धेश लाड (८९) हे दाेघेही मैदानावर खेळत अाहेत. न्यूझीलंडकडून ईश साेढीने शानदार गाेलंदाजी करताना दाेन गडी बाद केले. तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने शुक्रवारी ७ बाद ३२४ धावांवर अापला पहिला डाव घाेषित केला.
मुंबई संघाने दुसऱ्या दिवशी १ बाद २९ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. सलामीच्या केदार जाधव अाणि अरमान जाफरने सकाळच्या सत्रात न्यूझीलंडच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना टीमच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. याशिवाय त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०७ धावांची भागीदारी केली. केदारने झंझावाती फलंदाजी करताना शानदार शतक ठाेकले. तसेच जाफरने अर्धशतक झळकावले. त्याने १२३ चेंडूंमध्ये ६९ धावा काढल्या. यात ९ चाैकारांसह एका षटकारांचा समावेश अाहे. मात्र, ईश साेढीने ही जाेडी फाेडली. त्याने जाफरला राेंचीकरवी झेलबाद केले. त्यापाठाेपाठ राेहित १८ धावा काढून अाल्यापावली तंबूत परतला. सूर्यकुमार यादव व केदार जाधवने झंझावाती फलंदाजी केली. सूर्यकुमारने ८६ चेंडूंत ९ चाैकार व ८ षटकारांसह १०३ धावा काढल्या.

राेहित शर्मा अपयशी
राेहित शर्मा चमक दाखवू शकला नाही. ताे अपयशी ठरला. त्याला १८ धावांची खेळी करून तंबूत परतावे लागले. ईश साेढीने राेहितला झेलबाद केले.
केदार रिटायर्ड
केदारने रिटायर्ड झाल्याने मैदान साेडले. त्याने २२८ चेंडूंत १५ चाैकार व १ षटकारासह १०० धावा काढल्या. याशिवाय त्याने जाफरसाेबत १०७ धावांची भागीदारी केली.
> १०० धावांची केदारची खेळी
> १०३ धावा काढल्या सूर्यकुमारने
> ६९ धावा जाफरने चाेपल्या
> ८६ नाबाद धावांचे सिद्धेशचे याेगदान
> ५३ धावा अादित्य तरेच्या नावे
पुढील स्‍लाइडवर वाचा, अादित्य-सिद्धेशची अभेद्य शतकी भागीदारी
बातम्या आणखी आहेत...