मुंबई- येथील मरिन ड्राइव्ह येथे उभारण्यात आलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे शिल्प 24 तासांच्या आत काढा. अन्यथा कसलीही पूर्व कल्पना न देता त्यावर कारवाई करण्यात येईल. असे महानगर पालिकेने आरपीजी आर्ट फाउंडेशनला सांगितले आहे. तसे पत्रही महानगर पालिकेने आरपीजी आर्ट फाउंडेशनला पाठवले आहे. असे पत्र पाठवण्याची मनपाची ही दुसरी वेळ आहे.
आरपीजी आर्ट फाउंडेशनने मुंबईमध्ये सौंदर्यीकरणाच्या उद्धशाने विविध ठिकाणी शिल्पाकृती तयार केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी मरिन ड्राइव्ह येथे सचिन तेंडुलकरचे शिल्प उभारण्यात आले होते. मात्र, मरिन ड्राइव्ह परिसर हा एतिहासिक वारसा म्हणून घोषित झाला असून त्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांतही समावेश झाला आहे. त्यामुळे या शिल्पावर आक्षेप घेत, येथील रहिवाशांनी मागील वर्षी मुंबई एतिहासिक वारसा संबर्धन सिमती, महानगर पालिका आणि सचिन तेंडुलकर यांना पत्रही पाठवले होते. महानगर पालिकेने दुसऱ्यांदा पाठवलेल्या पत्रानंतर फाउंडेशनने हे शिल्प इतरत्र हलवण्याची तयारी दाखवली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सचिनचे मरिन ड्राइव्ह येथील शिल्प...