आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई रणजीच्या खेळाडूंबाबत एमसीए अनभिज्ञ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटकडे, आयपीएल सामना निकाल निश्चितीसंदर्भात विचारणा करण्यात आल्याची तक्रार करणारा खेळाडू आणि तशी विचारणा करणारा खेळाडू याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन अजूनही अनभिज्ञ आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान मुंबई रणजी संघातील खेळाडूकडे त्याच्या सहकार्‍याने सामना ‘फिक्स’ करण्याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे चिडलेल्या खेळाडूने त्या खेळाडूची तक्रार थेट अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती. या घटनेला कित्येक महिने लोटले तरीही एमसीए या पालक संघटनेला त्या दोन खेळाडूंची नावे जाणून घेण्यातही रस नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एमसीएचे कोशाध्यक्ष नितीन दलाल, जे गट समितीमध्ये संयुक्त सचिव होते, त्यांनी यासंदर्भात सांगितले, आम्ही खेळाडू कोण आहेत याबाबत विचारणा केली नाही. बीसीसीआयने यासंदर्भात आम्हालाही काहीही कळवले नाही. एमसीएच्या अन्य पदाधिकार्‍याने सांगितले, ‘आम्ही खाजवून कशाला खरूज करून घेऊ? बीसीसीआयने आम्हाला कळवले की मग विचार करू.’

राजस्थानचा लेगस्पिनर प्रवीण तांबेला त्याच्या रणजी संघातील सहकार्‍याने विचारले होते, असे प्रसिद्धिमाध्यमांनी म्हटले आहे. मात्र, या वृत्ताला एमसीएने दुजोरा दिला नाही. तांबेला तशी ‘ऑफर’ देणार्‍या खेळाडूचे नाव अद्याप बाहेर आले नाही. या दोन खेळाडूंची नावे राजस्थानला फ्रँचायझीच्या व्यवस्थापनाला ज्ञात असण्याची शक्यता आहे. अँटी करप्शन युनिट जोपर्यंत अहवाल बीसीसीआयला सादर करीत नाही तोपर्यंत बीसीसीआयलाही ही नावे कळण्याची शक्यता कमी आहे.
बातम्या आणखी आहेत...