आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई ६ गड्यांनी विजयी; अंकितची झुंज व्यर्थ! सय्यद मुश्ताक अली पश्चिम विभागीय टी-२० स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडोदा- सय्यद मुश्ताक अली पश्चिम विभागीय टी २० क्रिकेट स्पर्धेत युवा फलंदाज अंकित बावणेच्या अर्धशतकानंतरही महाराष्ट्राला मुंबईने ६ गड्यांनी पराभूत केले. मुंबईच्या आदित्य तरेने ७१ नाबाद विजयी अर्धशतकी खेळी केली. 
 
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने २० षटकांत ७ बाद १४८ धावा केल्या. सलामीवीर जोडी अवघ्या २१ धावांची भागीदारी करू शकले. कर्णधार स्वप्निल गुगळे १२ धावांवर तर ऋतुराज गायकवाड ९ धावा करून तंबूत परतले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संघातील मध्यल्याफळीतील भरवशाचा फलंदाज अंिकत बावणेने सूत्रे हाती घेत  संघाचा डाव सावरला. त्याने ४२ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकार खेचत ५० धावा ठोकल्या. अभिषेक नायरने अादित्य तरेकरवी त्याला झेलबाद करत अडथळा दूर केला. दरम्यान नौशाद शेख २ धावांवर बाद झाला. 

पाचव्या क्रमांकावर आलेल्या निखिल नाईकने अंकित सोबत ८५ धावांची भागीदारी रचली. नाईकने २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार लगावत ३९ धावा काढल्या. पी. भारतीने २७ तर जगदीश झोपेने ९ धावांची भर घातली. मुंबईच्या रोहन राजे आणि अभिषेक नायरने प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मुंबईने महाराष्ट्रवर १८.४ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. मुंबईची सुरुवात खराब झाली. संघाच्या अवघ्या २ धावा असताना सलामीवीर बिस्ट एका धावेवर बाद झाला. दुसरा सलामीवीर  जाफरने २७ धावा काढल्या. त्यानंतर  श्रेयस अय्यरने ४० चेंडूंत ३२ धावांची  खेळी केली. आदित्य तरेने  ३८ चेंडूंत ९ चौकार  व १ षटकार खेचत नाबाद ७१ धावा ठोकल्या. शिवम दुबे एक धाव करून परतला. 
बातम्या आणखी आहेत...