आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनच सामन्यांत मुस्ताफिजुर हीरो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - बांगलादेशचा १९ वर्षीय वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमान अवघ्या दोनच सामन्यांनंतर चर्चेत आला आहे. त्याने आपल्या करिअरच्या दोन वनडे सामन्यांत ११ बळी घेऊन नवा विक्रम केला आहे. वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांत अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे. दोन्ही सामन्यांत तो मॅन ऑफ द मॅच ठरला. मुस्ताफिजुरने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत ५० धावांत भारताच्या ५ विकेट, तर दुसर्‍या सामन्यात ८०.४५ च्या सरासरीने ४३ धावांत ६ गडी बाद केले. त्याने एकूण ११ गडी बाद केले. यापूर्वी हा विक्रम झिम्बाब्वेचा ब्रायन व्हिट्टोरीच्या नावे होता. त्याने पहिल्या दोन वनडेत १० गडी बाद केले होते.
बातम्या आणखी आहेत...