आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N Srinivasan Is Ready To Leave Chair Of ICC Chief

श्रीनिवासन पद सोडणार; सुंदररमण यांचा राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली/मुंबई - गेल्या काही वर्षांपासून वादाच्या घेऱ्यात अडकलेले आयसीसीचे प्रमुख एन.श्रीनिवासन यांची खुर्ची डगमगायला लागली असून बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष शशांक मनोहर लवकरच त्यांची जागा घेऊ शकतात, अशी क्रिकेट वर्तुळात शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान इंडियन प्रीमियर लीगचे (अायपीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररमण यांनी मंगळवारी अापल्या पदाचा राजीनामा दिला.

बीसीसीआय अध्यक्ष असताना आयपीएलच्या सहाव्या मोसमात जावई गुरुनाथ मयप्पनवर सिद्ध झालेले भ्रष्टाचाराचे आरोप व एकाधिकारशाहीमुळे अखेर श्रीनिवासन यांना पद गमवावे लागले होते. यंदाही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची िनवडणूक लढवण्यास मज्जाव केला होता. चर्चा होण्याची शक्यता होती.

राजीनामा स्वीकारला
आयपीएलचे वादग्रस्त सुंदररमण यांचा राजीनामा बीसीसीआयने स्वीकारला. टी-२० स्पर्धेच्या सहाव्या मोसमात रमण यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.