आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामिबियाचा २५ वर्षीय क्रिकेटपटू रेमंडचा मृत्यू, ब्रेन स्ट्रोकमुळे कोमात होता रेमंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विथोक- सामन्यादरम्यान ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर कोमात गेलेल्या नामिबियाचा २५ वर्षीय क्रिकेटपटू रेमंड वेन स्कूर याचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली. मागच्या रविवारी एका घरच्या सामन्यात फलंदाजी करताना रेमंडला ब्रेन स्ट्रोक आला होता. तेव्हापासून तो कोमात होता.

नेमकेकाय घडले होते?
फ्रीस्टेटविरुद्ध सामन्यात रेमंड ३५ व्या षटकात फलंदाजीला आला होता. १६ चेंडूंत १५ धावा काढून तो खेळत होता. ४३ वे षटक संपल्यानंतर डोकेदुखी होत असल्याचे सांगत त्याने पाणी मागितले. दोन घोट पाणी प्यायल्यानंतर रेमंड मैदानावरच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला ब्रेन स्ट्रोक आल्याचे सांगितले.

कोमातूनबाहेर आला नाही
तोकोमात गेल्याचे वृत्त बुधवारी कळले. पुढचे ४८ तास रेमंडसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि संकटाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. रेमंड कोमातून बाहेर येऊ शकला नाही. शुक्रवारी त्याला मृत्यूने कवटाळले.
रेमंडची कारकीर्द
-रेमंडने ९२ प्रथम श्रेणी सामन्यांत २७ च्या सरासरीने ४३०३ धावा काढल्या. त्याने शतके आणि २० अर्धशतके ठोकली.

-लिस्ट-ए मध्ये रेमंडने १०३ सामने खेळले. यात त्याने २९ च्या सरासरीने २६१८ धावा जोडल्या. १८ अर्धशतकेही काढली.

आयसीसीकडून श्रद्धांजली
रेमंडचामृत्यू हे मोठे नुकसान असल्याचे नामिबिया क्रिकेट संघटनेने सांगितले. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आणि जगातला नंबर वन फलंदाज ए. बी. डिव्हिलर्सनेसुद्धा रेमंडच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली. आयसीसीने िट्वट करून दु:ख व्यक्त केले.