आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी पदार्पणातच घेतल्या होत्या 16 विकेट, आता मुलगा करतोय कमाल, ग्लॅमरस आहे LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्गज माजी भारतीय लेग स्पिनर नरेंद्र हिरवानी यांनी वेस्ट इंडीजविरूद्ध टेस्टमध्ये डेब्यू केले. पदार्पणातच त्यांनी एक दोन नाही तर तब्बल 16 विकेट्स घेऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. चॅपकमध्ये त्याने दोन इनिंग्समध्ये 8-8 विकेट घेऊन व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कॅरिबियान संघाचा धुव्वा उडवला होता. हिरवानी यांच्या या कामगीरीच्या बळावर भारताने हा सामना 255 धावांनी जिंकला होता. त्यांचा मुलगा जूनिअर हिरवानी अर्थात मिहिर हिरवानी हादेखील त्यांच्याच पावलावर पावूल टाकताना दिसत आहे. मध्य प्रदेश रणजी टीमकडून खेळताना लेग स्पिनर मिहिरने आपल्या कारकिर्दीतील तिसऱ्याच फर्स्ट क्लास सामन्यात 9 विकेट घेतल्या. त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
बडोदाविरूद्ध केला हा पराक्रम
बडोदाविरुद्ध खेळताना त्याने पहिल्या इनिंगमध्ये 60 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये सामना चांगल्याच रोमांचक स्थितित असताना, त्याने 41 धावादेत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या बॉलिंगच्या बळावरच मध्यप्रदेशने बडोद्याला 87 धावांनी हरवले. मिहिरची बॉलिंग अॅक्शनही वडिलांप्रमानेच आहे.
3 सामने 11 विकेट्स
मिहिरने आतापर्यंत केवळ 3 फर्स्ट क्लास सामनेच खेळले आहे. यात त्याने एकूण 11 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या सामन्यात जम्मू-कश्मीरविरुद्ध त्याला बॉलिंगची फार कमी संधी मिळाली, कारण टीममध्ये जलज सक्सेना आणि अंकित शर्माच्या रुपात सीनियर स्पिनर्स होते. पहिल्या इनिंगमध्ये त्याला केवळ 4 ओव्हर टाकण्याचीच संधी मिळाली आणि त्याने 2 विकेट्स घेतल्या. तर, दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 1 ओव्हर टाकण्याची संधी मिळाली.
वडिलांच्या नावाचा आधार घेण्याची इच्छा नाही
नरेंद्र हिरवानी यांचा मुलगा असुनही बॉलिंगची हवी तशी संधी न मिळाल्याची त्याला खंत वाटत नाही. यावर मिहिर म्हणतो की, त्याला त्याची ओळख स्वतःलाच निर्माण करायची आहे. त्याला जगाला त्याचे टॅलेंट दाखवायचे आहे. मॅनेजरने आपला मागील बॅक ग्राउड पाहावा आणि निर्णय घ्यावा अशी त्याची बिलकून इच्छा नाही.
हिरमानी म्हणाले "अम्हा दोघांची स्टाइल वेगळी'
मुलाने शानदार बॉलिंग केल्यानंतर नरेंद्र हिरवानी म्हमाले का, तो एक चांगला गोलंदाज आहे, मात्र लोक त्याची तुलना माझ्याशी करतात, जे बरोबर नाही. अम्हा दोघांची बॉलिंग स्टाइल पुर्णपणे वेगळी आहे. तो माझ्यापेक्षा उंचही आहे, त्यामुळे अॅक्शनही भिन्न आहे. हाइटमुळे त्याचा बॉल अधिक बाउंस होतो, यामुळे बॅट्समनला खेळायला अडचन येते. मात्र त्याला आणखी फार लांब प्रवास करायचा आेहे. त्याला आणखी खुप काही शिकायचे आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मिहिर हिरवानीचे स्टायलिश फोटोज...