आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Nathu Singh Who Plays For Rajasthan Now Become A Star After IPL Auction This Year.

मजूराचा मुलगा बनला करोडपती, सचिन- मॅकग्राही याच्या बॉलिंगवर फिदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर नाथू सिंग (डावीकडे) आणि त्याचे पिता भरत सिंग. - Divya Marathi
क्रिकेटर नाथू सिंग (डावीकडे) आणि त्याचे पिता भरत सिंग.
स्पोट्स डेस्क- क्रिकेटर नाथू सिंग आज 21 वर्षाचा (8 सप्टेंबर 1995) झाला. नाथू या वर्षी फेब्रुवारीत चर्चेत आला जेव्हा त्याला IPL च्या लिलावात 3.2 कोटी रूपये मिळाले. त्याला नीता अंबानीची टीम मुंबई इंडियन् ने खरेदी केले होते. 10 लाखाची बेस प्राईस असणा-या या नवख्या खेळाडूवर पुणे सुपरजायन्ट्स आणि दिल्ली डेयरडेविल्स सारखी टीम टपून होती. नाथूचे वडील एक मजूर आहेत जे महिन्याकाठी केवळ 7 हजार रुपये कमवितात. अशा वेळी नाथू सिंगने क्रिकेट व IPL मध्ये झालेल्या त्याच्या प्रवासाने लोक आश्चर्यचकित झाले. मजूराचा मुलगा कसा बनला स्टार क्रिकेटर...
- नाथूचे पिता भरत सिंग जयपूर वायर फॅक्ट्रीत मजूरी करतात. त्याचा महिन्याचा पगार 7 हजार रुपये आहे.
- भरत आधी शेती करायचे पण त्यातून फारसे काही हाती लागत नसल्याने एका कारखान्यात काम करणे सुरु केले. नाथू टिन शेडच्या बनलेल्या दोन खोल्याच्या घरात मोठा झाला.
- गल्ली क्रिकेट खेळताना नाथू खूपच वेगाने चेंडू फेकायचा हे पिता भरतने पाहिले. त्याला क्रिकेट खेळायला शिकवले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.
- स्वत: भरतला क्रिकेटमधील फारसे काही कळत नव्हते. मात्र मुलाला क्रिकेट खेळायचे असेल तर त्याला खेळू द्यावे म्हणून भरत सिंगने त्याला एका तेथील क्लबमध्ये पाठवले.
- क्लबची वार्षित फी 10 हजार रुपये होती. दोन महिन्याचे पैसे भरले व त्यानंतर पाठवायचे की नाही हे ठरवू असे भरत सिंगने ठरवले.
- कधी सायकलवर तर बसमध्ये मुलाला ते क्लबमध्ये सोडायला जायचे.
- दोन महिन्यातच नाथू क्लबमधील स्टार खेळाडू ठरला. फॅमिलीची आर्थिक स्थिती पाहून त्याची फी क्लबनेच भरली.
- नाथू चांगले क्रिकेट खेळू लागला आणि त्याची निवड अंडर 19 टीममध्ये झाली. यानंतर तो राजस्थान रणजी टीममध्ये निवडला गेला.
दिग्गज झाले फिदा...
- नाथूने आपल्या गोलंदाजीने अनेक दिग्गज क्रिकेटर्सचे मन जिंकले. यात सचिन तेंडुलकर आणि माजी ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर ग्लेन मॅकग्रा यांचा समावेश आहे.
- मॅकग्राने एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये प्रॅक्टिस करताना नाथू सिंगला बॉलिंग करताना पाहिले. तेव्हा ग्लेन मॅकग्रा नाथूच्या वेगावर चांगलाच फिदा झाला होता.
- तेव्हा मॅकग्राने म्हटले होते की, हा मुलगा एक दिवस भारतीय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमवेल.
- नाथू 140 किमी प्रति तासी वेगाने बॉलिंग करू शकतो. त्याचे हे कौशल्य पाहून मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिनने त्याला IPL ऑक्शनदरम्यान खरेदी केले.
- रणजी ट्रॉफीत डेब्यू मॅचमध्ये त्याने राजस्थानकडून खेळताना दिल्लीविरूद्ध जबरदस्त प्रदर्शन केले होते.
- या मॅचमध्ये त्याने गौतम गंभीरच्या विकेटसह एकून 8 खेळाडूंना तंबूत धाडले होते.
- राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यासारखे स्टार इंडियन क्रिकेटर्स सुद्धा नाथूच्या जबरदस्त स्पीडवर फिदा आहेत.
- ऑक्टोबर 2015 मध्ये भारतात आलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या टीमविरूद्ध बोर्ड प्रेसिडेंट XI टीममध्ये नाथू सिंगचे सिलेक्शन झाले होते.
पुढे स्लाईड्मध्ये पाहा, यंग क्रिकेटर नाथू सिंह आणि त्याच्या घराचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...