आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या सिलेक्टर पदासाठी नयन मोंगियाचा अर्ज, व्यंकटेश प्रसादही रेसमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नयन मोंगियाचे पारडे सर्वात जड आहे. तो इतर अर्जदारांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. तसेच त्याला या क्षेत्रातील अनुभवही आहे. - Divya Marathi
नयन मोंगियाचे पारडे सर्वात जड आहे. तो इतर अर्जदारांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. तसेच त्याला या क्षेत्रातील अनुभवही आहे.
स्पोर्ट्स डेस्क- माजी विकेटकीपर नयन मोंगियाने टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यत्वसाठी अर्ज केला आहे. 40 कसोटी आणि 140 वन डे खेळलेला मोंगियाने बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनंतर हा अर्ज केला आहे. बीसीसीआयने प्रथमच सीनियर, जूनियर आणि महिला संघाच्या निवडीसाठी सदस्यांसाठी जाहिरात दिली आहे. बुधवारी याची डेडलाइन संपली. बीसीसीआयची या आहेत अटी...
- सीनियर टीमचे सिलेक्टर बनण्यासाठी बीसीसीआयने कडक अटी ठेवल्या आहेत. उमेदवाराचे वय 60 पेक्षा अधिक नसावे. तसेच त्याने 5 वर्षापूर्वीपेक्षा आधी क्रिकेट सोडलेले असावे.
- तसेच संबंधित व्यक्ती आयपीएल टीम, कोचिंग अॅकेडमी अथवा मीडिया हाऊसशी जोडलेला नसावा.
अनुभवी आहे मोंगिया-
- 46 वर्षाचा मोंगिया चार वर्षापासून बडोदा क्रिकेट असोसिएशन (बीसीए) च्या सीनियर आणि जूनियर टीमचा सिलेक्टर आहे.
- तो लोकल टीमचा सिलेक्टर सुद्धा राहिला आहे. अनुभव गाठीशी असल्याने त्याचा दावा मजबूत मानला जात आहे.
- अर्ज केल्यानंतर मोंगिया म्हणाला, “होय, मी नॅशनल सिलेक्टर बनू इच्छितो. मला या विषयातील खूप माहिती आहे.”
- टीम इंडियाचा माजी बॉलिंग कोच वेंकटेश प्रसादने सुद्धा या पोस्टसाठी अर्ज केला आहे.
यांनाही बनायचे सिलेक्टर
- 6 कसोटी आणि 23 वनडे खेळलेल्या माजी विकेटकीपर समीर दिघेने यासाठी अर्ज केला आहे.
- दिघे पाच वर्ष बीसीसीआय अॅकेडमी सोबत जोडला गेला आहे. त्याने त्रिपुरा रणजी टीमला कोचिंग केले आहे.
- 3 कसोटी आणि 10 वन डे खेळलेला लेफ्ट आर्म स्पिनर नीलेश कुलकर्णी आणि मुंबईचा माजी फास्ट बॉलर अभी कुरुविलाने सुद्धा अर्ज केला आहे.
- यासोबतच राष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या शिशिर हट्टंगडी, शंतनु सुगवेकर, रॉबिन सिंग (ज्यूनियर) आणि प्रीतम गंधेने सुद्धा अर्ज केला आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...