मुंबई - आयपीएलच्या 12व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला 7 विकेटने पराभूत केले. मुंबई संघाचा पराभव झाल्यानंतर या संघाच्या मालक नीता अंबानीं यांच्या हसतमुख चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. मग काय, सर्व कॅमेरे हा क्षण टीपण्यासाठी सरसावले.
विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्टीजचे चेअरमन आणि नीता यांचे पती मुकेश अंबानींचा 19 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या सामन्यात विजय मिळवून मुंबई इंडियन्स त्यांना बर्थ डेचे 'विजयी' गिफ्ट देऊ शकत होते, मात्र हे होऊ शकले नाही, याचेही दुःख कदाचित नीता यांना असावे.
मुंबई इंडियन्सने प्रथम बॅटिंग करत 20 ओव्हरमध्य 6 विकेट गमावत 142 रन्स केले. प्रत्युत्तरात हैदराबादने 17.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावत लक्ष्य गाठले. मॅच पाहाण्यासाठी क्रिकेटर्सच्या पत्नींसह अनेक सेलिब्रिटीज स्टेडियममध्ये उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सेलिब्रिटींचे हावभाव...