आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीएची नवी कार्यकारिणी सापडली वादाच्या भोवऱ्यात? सर्वसाधारण सभा न घेताच महाराष्ट्राची नवी कार्यकारिणी निवडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आपल्या कार्यकारिणीत घाई गडबडीने बदल केले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करावयाच्या बदलाची पद्धत वेगळी असल्याचे मत व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रथम लोढा समितीच्या न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारशीनुसार घटनेत बदल करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर बरखास्त कार्यकारिणीने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्यामध्ये नव्या कार्यकारिणीची निवड करणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तसे न करता मर्जीतील माणसांचीच पुन्हा एकदा वर्णी लावली आहे. त्यामुळे न्यायालयाचा रोष ओढवला जाऊ शकतो, अशी सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.  

आधीचे पदाधिकारी अपात्र ठरत असल्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केल्याचे, नव्याने निवड झालेल्या सचिवांनी स्वत:च स्वत:ची व कार्यकारिणीची निवड जाहीर केली आहे. त्यातही आश्चर्य व्यक्त होत आहे.

निवड समितीमधील दोघांना वगळण्याची शक्यता?
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाच्या १८ जुलैच्या आदेशाप्रमाणे, लोढा समितीने मंजूर केलेल्या निवड समितीची संख्या तीन आहे. त्यामुळे त्या आदेशानुसार दोन सदस्यांना वगळावे लागणार आहे. ५ जणांपैकी जतीन परांजपे व गगन खोडा हे दोघे जण रणजी क्रिकेट खेळले असल्याने बाद होण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी मुंबईत ५ जणांच्या समितीने भारतीय संघांची निवड केली होती. त्या वेळी सीईओ जोहरी यांनी लोढा समितीचे सचिव गोपाल शंकरनारायण यांना त्याबाबत विचारले होते. तेव्हा त्यांनी या वेळी अपवादात्मक बाब म्हणून परवानगी देण्यात येत आहे, असे सांगितल्याचे कळते. बीसीसीआयच्या समितीची रीतसर स्थापना होऊन पदाधिकाऱ्यांची निवड होत नाही, तोपर्यंत सीईओ जोहरी हेच निवड समितीचे निमंत्रक म्हणून काम पाहतील.
बातम्या आणखी आहेत...