आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडच्या ८ बाद ४०९ धावा; मार्टिन गुप्तिलने काढल्या १५६ धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डयुनेडिन - न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तिलने शतक ठोकून आपल्या टीकाकाराने जोरदार प्रत्युत्तर िदले आहे. श्रीलंकेविरुद्ध गुरुवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात गुप्तिलने १५६ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीच्या बळावर दिवसअखेर न्यूझीलंडने ८ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला.

या मालिकेपूर्वी गुप्तिलच्या फॉर्मवर शंका उपस्थित करताना त्याच्या निवडीवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, निवड समिती आणि कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने त्याच्यावर विश्वास राखला. गुप्तिलने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना पहिल्याच कसोटीत दणकेबाज शतक ठोकले. त्याने २३४ चेंडूंत २१ चौकारांसह दीड शतकी खेळी केली. त्याने लँथमसोबत ५६ धावांची सलामी दिली. लँथम २२ धावांवर बाद झाला.

विल्यम्सनसोबत भागीदारी :
मार्टिन गुप्तिल आणि केन विल्यम्सन यांनी दुसऱ्या िवकेटसाठी १७३ धावांची जबरदस्त भागीदारी केली. िवल्यम्सन ८८ धावा काढून बाद झाला. त्याचे शतक थोडक्याने हुकले. प्रदीपच्या गोलंदाजीवर करुणारत्नेने त्याचा झेल घेतला. रॉस टेलरला (८) मोठी खेळी करता आली नाही.
मॅक्लुमचा झंझावात
कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने वनडे स्टाइल अर्धशतक ठोकले. तो ७५ धावा काढून बाद झाला. त्याला सिरिवर्धनेने बाद केले. मॅक्लुमने ५७ चेेंडूंत १ षटकार व १३ चौकार खेचत ७५ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने ही फलंदाजी १३१.५७ च्या स्ट्राइक रेटने केली. त्याच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने पहिल्या दिवशी चारशे धावांचा टप्पा गाठला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड पहिला डाव : ८ बाद ४०९ धावा. (मार्टन गुप्तिल १५६, िवल्यम्सन ८८, ब्रेंडन मॅक्लुम ७५, २/६९ लकलम).
बातम्या आणखी आहेत...