आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडची विजयी सलामी; श्रीलंका १२२ धावांनी पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डुनेडिन - यजमान न्यूझीलंडने अापल्या घरच्या मैदानावर साेमवारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसाेटी जिंकली. यजमान टीमने १२२ धावांनी विजयाची नोंद केली. या विजयाच्या बळावर न्यूझीलंडला दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेता अाली. अाता मालिकेतील शेवटची अाणि दुसरी कसाेटी १८ डिसेंबरपासून हॅमिल्टनमध्ये रंगणार अाहे.
पहिल्या डावात धडाकेबाज १५६ धावांची खेळी करणारा मार्टिन गुप्तिल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यजमान टीमने विजयासाठी दिलेल्या ४०५ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंका टीमने दुसऱ्या डावात अवघ्या २८२ धावांपर्यंंत मजल मारून धूळ चाखली. त्यामुळे यजमान टीमला माेठ्या फरकाने सलामीच्या कसाेटीत विजय संपादन करता अाला. श्रीलंका संघाकडून दिनेश चांदिमलने ५८ धावांची केलेली खेळी व्यर्थ ठरली.

नव्या युगाची गरज : मॅथ्यूज
श्रीलंका टीमला अाता नव्या युगात पदार्पण करण्याची गरज अाहे. त्यासाठी टीमने कुमार संगकारा अाणि महेला जयवर्धनेच्या युगातून स्वत:ला बाहेर काढणे अावश्यक अाहे, अशी प्रतिक्रिया कसाेटी टीमचा कर्णधार मॅथ्यूजने दिली. न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर त्याने संघातील बदलाची चर्चा केली. ‘संघात जवळजवळ सर्वच युवा खेळाडू अाहेत, असेही या वेळी ताे म्हणाला.

टीम साउथी चमकला
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात टीम साउथी चमकला. त्याने शानदार गाेलंदाजी करताना ५२ धावा देत तीन विकेट घेतल्या. त्याने सलामीच्या करुणारत्नेसह मेंडिस अाणि वितांगेला बाद केले. तसेच ट्रेंट बाेल्ट, मिशेल सेंटनेर अाणि नील वेगनरने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. डग ब्रेसवेलला एक गडी बाद करता अाला.
बातम्या आणखी आहेत...