आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Zealand Captain Martin Crowe Dies In Auckland At The Age Of 53

NZ चे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांचे निधन, 20 वर्षांपूर्वी आणला होता T-20 फॉर्मेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन- न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज मार्टिन क्रो यांचे ऑकलंडमध्ये आज (गुरुवारी) निधन झाले. ते 53 वर्षाचे होते. क्रो यांनी 20 वर्षांपूर्वी न्यूझीलंडच्या क्रिकेटमध्ये टी-20 सारखा 'क्रिकेट मॅक्स' फॉर्मेट आणला होता. क्रो 2012 पासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी लोरेन डाउन्स आणि दत्तक घेतलेली दोन मुले असा परिवार आहे.
क्रो यांनी 1995 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. नंतर ते टीव्ही कमेंटेटर बनले होते. क्रो यांनी न्यूझीलंडकडून 77 कसोटी व 143 एक‍दिवसीय सामने खेळले होते. यादरम्यान, क्रो यांनी 45.36च्या सरासरीने 5,444 धावा केल्या होत्या, तर कसोटीत 17 शतके ठोकली होती. क्रो हे सलग 13 वर्ष न्यूझीलंडचे कर्णधारपदी होते. यामुळेच मार्टिन यांना न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कणा मानले जात होते. क्रो यांनी 8 डिसेंबर 1995 भारताविरुद्ध कटकमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

पुढील स्लाइडवर वाचा....
@कसोटीत 17 शतके, श्रीलंकेविरुद्ध 299वर आउट...
@ काय होते 'क्रिकेट मॅक्स?