आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडच्या विजयात निकहोल्सचे अर्धशतक, ७० धावांनी पाकिस्तानवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन- मधल्या फळीचा फलंदाज हेनरी निकहोल्सच्या शानदार ८२ धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत पाकिस्तानवर ७० धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २८० धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाकला ४६ षटकांत २१० धावाच काढता आल्या.

धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ६२ धावा काढल्या. त्याने ७६ चेेंडूंचा सामना करताना ६ चौकारांसह ही खेळी केली. मो. हफिजने तिस या क्रमांकावर येऊन ५६ चेंडूंत १ चौकार, १ षटकारासह ४२ धावा काढल्या. शोएब मकसूदने १०, तर यष्टिरक्षक फलंदाज सर्फराज अहेमदने २९ चेंडूंत ३ चौकारांसह ३० धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार अझहर अलीने १९, अहेमद शहेजादने १३ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने चार व इलियटन तिघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

निकहोल्सची झुंज
न्यूझीलंडकडून निकहोल्सने १११ चेंडूंत ७ चौकारांसह ही खेळी केली. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. गुप्तिल ११ व लॉथम ११ धावा काढून बाद झाले. कर्णधार केन विल्यम्सनही (१०) स्वस्तात बाद झाला. तर मॅक्लीनघन (३१) चेंडू लागल्याने जखमी होऊन निवृत्त झाला.

संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड : ५० षटकांत ८ बाद २८०. पाकिस्तान : ४६ षटकांत सर्वबाद २१० धावा.