आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडकडून श्रीलंकेला 405 धावांचे खडतर लक्ष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डुनेडिन - यजमान न्यूझीलंडने पहिल्या कसाेटीत विजयासाठी पाहुण्या श्रीलंका टीमसमाेर ४०५ धावांचे खडतर अाव्हान ठेवले. प्रत्युत्तरामध्ये दुसऱ्या डावात श्रीलंका संघाची निराशाजनक सुरुवात झाली. त्यामुळे या पाहुण्या टीमला रविवारी चाैथ्या दिवसअखेर ३ गड्यांच्या माेबदल्यात १०९ धावांची खेळी करता अाली. चांदिमल नाबाद ३१ धावांवर खेळत अाहे. गाेलंदाजीत न्यूझीलंडकडून टीम साउथीने दाेन अाणि वागनेरने एक गडी बाद केला. कुशाल मेंडिस (४६), सलामीवीर करुणारत्ने (२९) अाणि जयसुंदेरा (३) हे झटपट बाद झाले.
चाैथ्या दिवशी न्यूझीलंडच्या लाॅथमने (१०९) शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला २६७ धावांवर अापला दुसरा डाव घाेषित करता अाला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने ३ बाद १०९ धावा काढल्या. विजयासाठी २९६ धावांची गरज असलेल्या श्रीलंका टीमकडे अाता सात विकेट शिल्लक अाहेत.

लाॅथमचा शतकी धमाका
न्यूझीलंडच्या लाॅथमने शानदार शतकी धमाका उडवला. त्याने १८० चेंडूंचा सामना करताना आठ चाैकारांच्या अाधारे १०९ धावा काढल्या. याशिवाय त्याने केन विलियम्सनसाेबत दुसऱ्या गड्यासाठी १४१ धावांची मजबूत भागीदारी केली. विलियम्सनने ११५ चेंडूंत सात चाैकारांसह ७१ धावा काढल्या. त्यानंतर अालेला राॅस टेलर (१५) फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवू शकला नाही. त्याला हेराथने त्रिफळाचीत करून तंबूत पाठवले.
बातम्या आणखी आहेत...