आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • New Zealand Tour Of India, 1st Test: India V New Zealand At Kanpur, Sep 22 26, 2016

भारताची सामन्यावर पकड; जडेजाने ५ तर, अश्विनने ४ बळी घेत किवींना गुंडाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविंद्र जडेजाने 73 धावांत 5 गडी टिपले. - Divya Marathi
रविंद्र जडेजाने 73 धावांत 5 गडी टिपले.
कानपूर - रवींद्र जडेजा (५ विकेट) आणि रविचंद्रन अश्विन (४ विकेट) यांच्या घातक गोलंदाजीनंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या नाबाद अर्धशतकांच्या बळावर भारताने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी भारताकडे एकूण २१५ धावांची आघाडी झाली होती. तिसऱ्या दिवसअखेर मुरली विजय आणि पुजारा यांच्या नाबाद १०७ धावांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारताने १ बाद १५९ धावा काढल्या. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या दोन सत्रांत भारतीय फिरकीपटू, तर तिसऱ्या सत्रात भारतीय फलंदाजांनी दबदबा ठेवला. चांगल्या सुरुवातीनंतरही पाहुण्या न्यूझीलंड संघाचा डाव गडगडला.

शनिवारी सकाळी भारतीय गाेलंदाजांच्या दमदार प्रदर्शनामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव ९५.५ षटकांत २६२ धावांत आटोपला. भारताने पहिल्या डावात ५६ धावांची निर्णायक आघाडी घेतली. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९ विकेट शिल्लक ठेवून ४७ षटकांत १ बाद १५९ धावा काढून एकूण आघाडी २१५ धावांची केली. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुलने (३८) पहिल्या विकेटसाठी मुरली विजयसाेबत ५२ धावांची अर्धशतकी सलामी दिली. यानंतर विजय (६४) आणि पुजाराने (५०) एकही विकेट पडू दिली नाही.
जडेजाची लय मोडण्यासाठी किवींनी घेतले बरेच ब्रेक
किवी फलंदाजांनी जेवणाच्या ब्रेकनंतर असे बरेच ब्रेक घेतले जे आधी ठरलेले नव्हते. यामुळे अनेक जण चकित झाले. भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी थेट न सांगता म्हटले की, बहुदा खेळ संथ करणे तसेच झटपट आपले षटक पूर्ण करणाऱ्या रवींद्र जडेजाची लय बिघडवण्यासाठी ही किवींची रणनीती असू शकते. ही एक रणनीती असण्याची शक्यता आहे, असेही बांगर यांनी नमूद केले.
७ धावांत किवींच्या अखेरच्या ५ विकेट
न्यूझीलंडची टीम ५ बाद २५४ अशी सुस्थितीत हाेती. यानंतर २५५ च्या स्कोअरवर त्यांची सहावी विकेट पडली. न्यूझीलंडने आपल्या अखेरच्या पाच विकेट अवघ्या ७ धावांत गमावल्या. २५८ च्या स्कोअरवर सातवी, आठवी आणि नववी विकेट पडली. २६२ वर अखेरची विकेट पडली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, धावफलक व भारत- न्यूझीलंड कसोटीतील क्षणचित्रे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...