आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • New Zealand Tour Of India, 4th ODI: India V New Zealand At Ranchi, Oct 26, 2016

IND vs NZ: न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी; धोनीच्या होम ग्राउंडवर भारताचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम साऊथी - Divya Marathi
टीम साऊथी
रांची- ‘गोलंदाजांनी कमावले, मात्र फलंदाजांनी गमावले,’ असे टीम इंडियासोबत रांची येथील वनडेत घडले. भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन करून न्यूझीलंडला बाद २६० धावांवर रोखले. भारतीय संघ हे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते. मात्र, टीम इंडियाच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. भारताला ४८.४ षटकांत सर्वबाद २४१ धावाच काढता आल्या. चौथ्या वनडेत न्यूझीलंडने भारताला १९ धावांनी पराभूत करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरी केली. आता मालिकेतील पाचवा सामना २९ आॅक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार असून या सामन्याला ‘फायनल'चे रूप आले आहे. भारताकडून एकमेव रहाणेने अर्धशतक ठोकले.

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यातही अपयशी ठरला. रोहित केवळ ११ धावा काढून बाद झाला. त्याने १९ चेंडूंत चौकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला भारताची ‘रनमशिन' विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. २० व्या षटकात भारताच्या ९८ धावा झाल्या असताना कोहली बाद झाला. कोहलीने ५१ चेंडूंत षटकार, चौकारांसह ४५ धावा काढल्या. ईश सोढीने कोहलीला विकेटकीपर वॉटलिंगकरवी झेलबाद केले.

घरच्या मैदानावर धोनी अपयशी : घरच्यामैदानावर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अपयशी ठरला. धोनीने ३१ चेंडूंचा सामना करताना केवळ ११ धावा काढल्या. निशामने त्याला त्रिफळाचीत केले. धोनीने रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे १२, तर महाराष्ट्राचा केदार जाधव शून्यावर बाद झाले. मधल्या फळीत या दोघांचे अपयश टीम इंडियाला भोवले. या दोघांना साऊथीने बाद केले. केदार जाधवला तर भोपळासुद्धा फोडता आला नाही.

रहाणेचे अर्धशतक : एकाटोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकाने अजिंक्य रहाणेने अर्धशतक काढले. त्याने ७० चेंडूंत षटकार, चौकार मारताना ५७ धावा काढल्या. मधल्या फळीत अक्षर पटेलने ४० चेंडूंत ३८ धावा काढल्या.

न्यूझीलंड:
गुप्तिलझे. धोनी गो. पंड्या ७२ ८४ १२
लँथम झे. रहाणे गो. अक्षर ३९ ४० ०४
विल्यम्सन झे. धोनी गो. मिश्रा ४१ ५९ ०४
टेलर धावबाद (कुलकर्णी/धोनी) ३५ ५८ ०१
निशाम झे. कोहली गो. मिश्रा ०६ ०९ ०१
वॉटलिंग झे. रोहित गो. कुलकर्णी १४ २१ ०१
डेविक झे. पंड्या गो. उमेश ११ ११ ००
मिशेल सँटनर नाबाद १७ १२ ०१
टीम साऊथी नाबाद ०९ ०५ ०१

अवांतर: १६,एकूण:५० षटकांत बाद २६० धावा. गोलंदाजी:उमेश १०-१-६०-१, धवल ७-०-५९-१, पंड्या ५-०-३१-१, मिश्रा १०-०-४२-२, अक्षर १०-०-३८-१, केदार जाधव ८-०-२७-०.

भारत:
अजिंक्य रहाणे पायचीत निशाम ५७ ७० ०५
रोहित झे. वॉटलिंग गो. साऊथी ११ १९ ०२
कोहली झे. वॉटलिंग गो. सोढी ४५ ५१ ०२
धोनी त्रि.गो.निशाम ११ ३१ ००
अक्षर त्रि. गो. बोल्ट ३८ ४० ०३
मनिष झे. लँथम गो. साऊथी १२ १२ ०२
केदार पायचीत गो. साऊथी ०० ०१ ००
पंड्या झे. लँथम गो. सँटनर ०९ १३ ००
अमित मिश्रा धावबाद १४ १७ ०१
धवल नाबाद २५ २६ ०२
उमेश झे. टेलर गो. बोल्ट ०७ १२ ००
अवांतर: १२.एकूण: ४८.४षटकांत सर्वबाद २४१. गोलंदाजी: साऊथी९-०-४०-३, बोल्ट ९.४-१-४८-२, निशाम ६-०-३८-२, सँटनर १०-०-३८-१, सोढी १०-१-५२-१, डेविक ४-०-२२-०.

दोन्ही संघांनी केले बदल
भारतीय संघाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी धवल कुलकर्णीला संधी दिली. बुमराह पूर्ण फिट नसल्याने कर्णधार धोनीने त्याच्या जागी धवल कुलकर्णीला संधी दिली.
चौथ्या वनडेत पाहुण्या संघाने तीन बदल केेले. मालिकेत फ्लॉप ठरणारा कोरी अँडरसन, ल्यूक रोंची आणि मॅट हेनरी यांना बाहेर करण्यात आले. त्यांच्या जागी ईश सोढी, डेविच, वॉटलिंग यांना संधी देण्यात आली. भारताच्या धवलने षटकांत ५९ धावांत गडी बाद केला. भारताला जसप्रीत बुमराहची उणीव जाणवली.

महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपल्या शानदार यष्टिरक्षणाची प्रचिती दिली. न्यूझीलंडच्या ४६ व्या षटकात रॉस टेलर ३४ धावांवर खेळत होता. त्याने उमेश यादवच्या तिसऱ्या चेंडूला फाइन लेगवर फ्लिक केले आणि पहिली धाव घेतली. यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी तो पळाला. सीमारेषेजवळ धवल कुलकर्णीने चांगले क्षेत्ररक्षण करताना चेंडू धोनीकडे फेकला. धोनीने आपल्या खास शैलीत स्टम्पकडे बघता चेंडूला फक्त योग्य दिशा दिली आणि चेंडू स्टम्पवर जाऊन आदळला. त्या वेळी टेलर क्रीजबाहेर होता. टेलर धावबाद झाला. साधारणपणे विकेटकीपर आधी चेंडूला नीट पकडून नंतर चेंडू यष्टीवर मारतात. मात्र, धोनी आपल्या या शैलीसाठी खास प्रसिद्ध आहे.

गुप्तिलची बॅट तळपली
डावाची सुरुवात गुप्तिल-लँथम यांनी केली. दोघांनी चांगली सुरुवात केली. खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर दोघांनी फटकेबाजी केली. गुप्तिलने मालिकेतील पहिले अर्धशतक ५६ चेंेडूंत पूर्ण केले. या जोडीला अक्षर पटेलने १५ व्या षटकात मोडले. लँथमला अक्षरने रहाणेकरवी झेलबाद केले. १३८ च्या स्कोअरवर हार्दिक पंड्याने धोकादायक ठरत असलेल्या गुप्तिलला धोनीकरवी झेलबाद केले. गुप्तिलने ८४ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या साहाय्याने ७२ धावा काढल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या टेलरने ५८ चेंडूंचा सामना करताना चौकारासह ३८ धावा काढल्या. ४१ धावा काढणाऱ्या विल्यम्सनला अमित मिश्राने बाद केले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आजच्या व मोहालीतील सामन्यातील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...