आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Zealands Women Cricketer Sophie Devine Slams Fastest T20 Fifty

महिला क्रिकेट - केवळ 22 चेंडूत वेचल्‍या 70 धावा, हिने केली वेगवान फटकेबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
70 धावा काढल्‍यानंतर न्‍यूझिलँडची कर्णधार सोफी डिवाइन. - Divya Marathi
70 धावा काढल्‍यानंतर न्‍यूझिलँडची कर्णधार सोफी डिवाइन.
बंगळूरू - भारताच्‍या विरोधात महिला क्रिकेटमध्‍ये पहिल्‍या T 20 सामन्‍यात न्यूझिलँडने 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. स्टार प्लेयर आणि कर्णधार सोफी डिवाइन हिची या विजयात महत्‍त्वाची भूमिका राहिली आहे. तिने आपल्‍या संघाला जिंकून तर दिलेच, शिवाय महिला T20 मध्‍ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्‍याचे रेकॉर्डही तिने केले आहे.

18 चेंडूंमध्‍ये अर्धशतक
सोफी डिवाईन हिने 22 चेंडूंमध्‍ये एकूण 70 धावा काढल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये 5 चौकार आणि 8 छटकार तिने लगावले आहेत. त्‍याआधी
तिने केवळ 18 चेंडूंमध्‍ये अर्धशतक केले. या कामगिरीचे तिच्‍या चाहत्‍यांनी कौतूक केले.
मितालीने बनवल्‍या सर्वाधिक धावा
भारताकडून कर्णधार मिलाती राज हिने सर्वाधिक 35 धावा काढल्‍या. मितालीशिवाय अन्‍य खेळाडूला 20 धावांवर टिकून खेळता आले नाही. भारतीय टीम 19.5 ओव्‍हरमध्‍ये 125 धावा काढून ऑलआऊट झाली. न्यूझिलँडकडून मोर्ना निलसन आणि पिटरसनने सर्वाधिक म्‍हणजे तीन तीन विकेट्स घेतल्‍या. प्रत्‍युत्‍तरात न्यूझिलँडने 12.3 ओव्‍हरमध्‍ये केवळ दोन गडी गमावून लक्ष गाठले.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोफी डिवाईनचे फोटो..