आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही आमच्या ताकदीचा विचार करतो, ऑस्ट्रेलियाच्या नाही : अजिंक्य रहाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - ऑस्ट्रेलियन संघाची पूर्वतयारी काय आहे किंवा त्यांनी गोलंदाज कोणकोणते आणले आहेत, ते शेरेबाजी करणार आहेत का? आदी प्रश्नांपेक्षा भारतीय संघ आपल्या सक्षमतेवर आणि ताकदीचा विचार करीत आहे, असे भारतीय संघाच्या मधल्या फळीचा आधारवड अजिंक्य रहाणे याने आज पुण्यात पहिल्या कसोटीपूर्वीच्या सरावादरम्यान सांगितले.  

अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला, प्रतिस्पर्धी काय करणार आहे, यापेक्षा आमची ताकद काय आहे, ती ताकद वाढविण्याबाबत काय करायला हवे याचा आम्ही विचार करीत आहोत. 
 
दुखापती हा या खेळाचा अविभाज्य अंग आहे. प्रत्येक खेळाडूला त्यातून कधी ना कधी जावेच लागते. मलाही दुखापतीमुळे काही काळ ‘ब्रेक’ घ्यावा लागला, असेही रहाणे पुढे म्हणाला. बांगलादेशविरुद्ध कसोटीत खेळण्याचा खूप फायदा झाला.
 
दुखापतीनंतर मॅच फिटनेस सिद्ध करताना आणि फलंदाजीच्या सरावात येताना त्या डावाचा खूपच उपयोग झाला, असेही रहाणेने सांगितले. हैदराबाद येथील बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटीत रहाणेने ८२ धावा काढल्या होत्या. त्या आधी इंग्लंडविरुद्ध तो अपयशी ठरला होता.
बातम्या आणखी आहेत...