आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाचे दडपण बिलकुल नाही : विराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाही अन्य मालिकांसारखीच ही एक मालिका आहे. त्यामुळे भारतीय संघावर कोणत्याही प्रकारचे दडपण नाही. संघ पूर्णपणे तंदुरुस्त असून, मालिकेआधीचा अभ्यास सराव व्यवस्थित झाला आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने या मालिकेत उतरत आहोत, असे कर्णधार कोहलीने पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
नेतृत्वाचे दडपण माझ्यावर कधीही आले नाही, येणार नाही. विशेषत: फलंदाजीच्यावेळी माझ्यावर निश्चितच दबाव नसेल याची मला खात्री आहे. उलट नेतृत्वाच्या जबाबदारीमुळे मी फलंदाजीत अधिक काळजीपूर्वक खेळतो. चुकीचा फटका खेळणार नाही याची सतत काळजी घेत असतो. नेतृत्वामुळे माझ्यातील गुणवत्ता अधिक अचूक व जबाबदार बनली आहे, असे तो म्हणाला.
 
आम्ही या आधीही दर्जेदार संघाशी खेळलो आहोत. इंग्लंड संघाविरुद्धची मालिका अतिशय चुरशीने खेळली गेली, होती. ऑस्ट्रेलियन संघ त्यापेक्षा वेगळा नाही.
 आम्ही त्यांचा आदर करतो, मात्र वाजवीपेक्षा त्यांना जास्त महत्वही देणार नाही.
 
प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाडूंबाबत आम्ही फारशी काळजी करीत नाही. आम्ही आमच्या क्षमतेबाबत जागरूक आहोत. मानसिकदृष्ट्या जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांचा सामना करताना दडपण येत नाही, असेही कोहलीने म्हटले. प्रत्येक मालिकेनंतर स्वत: स्वत:चे मुल्यमापन मी करीत नाही.  मी खेळावर लक्ष्य केंद्रित करतो, असे भारताच्या कर्णधाराने नमूद केले.
 
..तर भारताला ६.६९ कोटी मिळतील
भारतीय संघ १२१ गुणांसह कसोटीत नंबर वन आहे. भारताचे आताचे प्रदर्शन बघताना १ एप्रिलपर्यंत टीम इंडिया नंबर वनच्या स्थानावर कायम राहू शकते. असे झाले तर भारताला १ मिलियन डाॅलर (जवळपास ६.६९ कोटी रुपये) बक्षीस आयसीसीकडून मिळेल.
बातम्या आणखी आहेत...