आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावसकर यांनी केली क्लार्कची बोलती बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - बंगळुरू कसोटीबाबत अजूनही भारत-ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंत संघर्ष सुरू आहे. मैदानाबाहेर सुद्धा डीआरएसवरून दोन्ही संघांचे खेळाडू समोरासमोर आहेत. मैदानात खेळाडूंत विजयासाठी स्पर्धा रंगात होती तेव्हा इकडे समालोचकाच्या बॉक्समध्ये सुद्धा दोन समालोचकांत जोरदार वाक््युद्ध सुरू होते. सामन्यात जसजसा रोमांच वाढत होता, तसतसे कॉमेंट्री बॉक्समध्येही वातावरण गरम होत होते. मैदानात विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर इकडे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला चीत केले.  
 
बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने समालोचनाच्या वेळी भारतीय फलंदाजांची टिंगल उडवण्याचा प्रयत्न केला. भारताच्या दुसऱ्या डावात वृद्धिमान साहा आणि ईशांत शर्मा फलंदाजी करत होते, तेव्हा या दोघांनी ऑस्ट्रेलियाला अखेरच्या विकेटसाठी थोडी वाट बघायला लावली. याआधी भारताच्या ६ विकेट लवकर पडल्या. मात्र शेवटच्या विकेटने झुंज दिली. भारताची अखेरची विकेट लवकर पडावी, असे क्लार्कला वाटत होते. यादरम्यान समालोचनाच्या वेळी मायकेल क्लार्कने आपले सहकारी समालोचक सुनील गावसकर यांच्याशी चर्चेत म्हटले की, ‘आता या वेळी ऑस्ट्रेलियन संघात ब्रेट ली असता तर त्याने ईशांत शर्माला इतका वेळ खेळू दिले नसते.’  
 
गावसकरचे सडेतोड उत्तर
या वेळी ब्रेट ली सुद्धा समालोचकांच्या बॉक्समध्ये हजर होता. क्लार्कने गावसकर यांना विनोदात ब्रेट लीला खेळण्याची संधी देऊन तर बघा, असे म्हटले. गावसकर शांततेने मायकेल क्लार्कचे ऐकत होते. क्लार्कचे बोलणे झाल्यावर गावसकर यांनी तत्काळ त्याला उत्तर दिले. गावसकर यांच्या उत्तरामुळे क्लार्कचे तोंड बंद झाले. गावसकर म्हणाले, ‘राहुल द्रविडचे घर चिन्नास्वामी स्टेडियमपासून १० किमी अंतरावरच आहे. जर तो फलंदाजीसाठी आला तर ब्रेट लीला तो सहजपणे गोलंदाजी करू देणार नाही. सांगा, बोलवू काय द्रविडला ?...’ गावसकर यांच्या या उत्तराने सर्वांची तोंडे बंद झाली. क्लार्क काहीच बोलला नाही.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...