आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंडिसने झळकावले शतक; श्रीलंकेची दमदार सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅले - बांगलादेशविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यात श्रीलंकेच्या कुशल मेंडिसने (१६६) नाबाद शतक ठाेकले. याशिवाय असेला गुणारत्नेने (८५) संयमी खेळी करताना अर्धशतक झळकावले. या शानदार खेळीच्या बळावर श्रीलंकेने पहिल्या कसाेटीच्या पहिल्या दिवसअखेर मंगळवारी ४ बाद ३२१ धावा काढल्या. अाता मेंडिस अाणि डिकवेला (१४) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रेहमान, तस्कीन अहमद, सुबाशिस राॅय अाणि मेंहदी हसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.  

नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार हेराथचा हा निर्णय बांगलादेशचा गाेलंदाज राॅयने चुकीचा ठरवला. त्याने सलामीवीर थरंगाला (४) झटपट बाद करून तंबूत पाठवले. तसेच त्याने संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर मेंडिसने संघाचा डाव सावरला. त्याने सलामीवीर करुणारत्नेसाेबत (३०) दुसऱ्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली.

 दरम्यान, मेंहदी हसन मिराझने करुणारत्नेला त्रिफळाचीत केले. त्यापाठाेपाठ चांदिमल (५) स्वस्तात बाद झाला. त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही. 
 
मेंडिस-गुणारत्नेची शतकी भागीदारी 
श्रीलंकेचा कुशल मेंडिस अाणि असेल गुणारत्नेने चाैथ्या विकेटसाठी १९६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान मेंडिसने २४२ चेंंडूंचा सामना करताना १८ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे १६६ धावांची खेळी केली. गुणारत्नेने १३४ चेंडूंत ८५ धावा काढल्या. यात ७ चंाैकारांचा समावेश अाहे. त्याला तस्कीन अहमदने बाद केले.
 
बातम्या आणखी आहेत...