Home »Sports »From The Field» News About BCCI 41 Ranji Champion Full Timer In Mumbai Withdrawal

41 वेळा रणजी चॅम्पियन मुंबईचे पूर्णवेळ सदस्यत्व संपुष्टात!

वृत्तसंस्था | Mar 20, 2017, 03:33 AM IST

  • 41 वेळा रणजी चॅम्पियन मुंबईचे पूर्णवेळ सदस्यत्व संपुष्टात!
नवी दिल्ली - एकेकाळी भारतीय क्रिकेटचे शक्तिस्थान असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) बीसीसीआयचे पूर्णवेळ सदस्यत्व गमावले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून गठित प्रशासकीय समितीने (सीओए) मंडळाची नवी घटना तयार केली आहे. लाेढा समितीच्या शिफारशीनुसार एक राज्य, एक मत हा नियम लागू झाला आहे. यानुसार महाराष्ट्रातून मुंबईसह विदर्भाचे पूर्णवेळ सदस्यत्व संपुष्टात आले आहे. मतदानाचा अधिकार केवळ महाराष्ट्राकडे राहिला आहे.
गुजरातमधून बडोदा आणि सौराष्ट्राचे पूर्णवेळ सदस्यत्व समाप्त झाले. नव्या घटनेनुसार बिहार, तेलंगण, उत्तराखंड आणि नॉर्थ-ईस्टची सर्व राज्ये आता बीसीसीआयचे पूर्णवेळ सदस्य बनली असून त्यांना मतदानाचा अधिकारही मिळाला आहे. बीसीसीआयच्या पूर्णवेळ सदस्यांची संख्या आता ३० झाली आहे. बीसीसीआयची नवी घटना संकेतस्थळावर अपलोड केली आहे.
आता महाराष्ट्र, गुजरातमध्ये रोटेशन पद्धत
महाराष्ट्रात पहिल्या वर्षी महाराष्ट्र, दुसऱ्या वर्षी मुंबई, तर तिसऱ्या वर्षी विदर्भ पूर्णवेळ सदस्य असेल. याचप्रमाणे पहिल्या वर्षी गुजरात, दुसऱ्या वर्षी बडोदा आणि नंतर सौराष्ट्र पूर्णवेळ सदस्य असेल. जे पूर्णवेळ सदस्य नाहीत, ते असोसिएट सदस्य असतील. मात्र, त्यांच्याकडे बोर्डात मतदानाचा अधिकार नसेल.
९ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ नाही
नव्या घटनेनुसार आता कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राज्य संघटना आणि बीसीसीआय मिळून ९ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ राहणार नाही. म्हणजे एखाद्याने राज्य संघटना आणि बीसीसीआयची एकूण ९ वर्षे पूर्ण केली असतील तर प्रशासक म्हणून त्याची कारकीर्द संपली आहे. याशिवाय ७० वर्षांची वयोमर्यादा तसेच दोन कार्यकाळांमध्ये ३ वर्षांचा कूलिंग पीरियडचा नियमही घटनेत आहे.
बीसीसीआयचे ३० पूर्णवेळ सदस्य असे
१. आंध्र प्रदेश, २. अरुणाचल प्रदेश, ३. आसाम, ४. बिहार, ५. छत्तीसगड, ६. दिल्ली, ७. गोवा, ८. गुजरात, ९. हरियाणा, १०. हिमाचल प्रदेश, ११. जम्मू-काश्मीर, १२. झारखंड, १३. कर्नाटक, १४. केरळ, १५. मध्य प्रदेश, १६. महाराष्ट्र, १७. मणिपूर, १८. मेघालय, १९. मिझोराम, २०. नागालँड, २१. ओडिशा, २२. पंजाब, २३. राजस्थान, २४. सिक्कीम, २५. तामिळनाडू, २६. तेलंगण, २७. त्रिपुरा, २८. उत्तर प्रदेश, २९. उत्तराखंड, ३०. पश्चिम बंगाल.
रणजीत खेळणार मुंबईचा संघ
पूर्णवेळ सदस्यत्व संपल्यानंतरही मुंबई, विदर्भ, सौराष्ट्र, बडोदाचे संघ रणजी ट्रॉफीत खेळतील. याशिवाय जे नऊ नवे पूर्णवेळ सदस्य बनले आहेत, तेसुद्धा पुढच्या सत्रात रणजीत खेळतील.
स्पर्धेचे नियोजन लवकरच केले जाईल.
- रेल्वे, सेनादल, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), नॅशनल क्रिकेट क्लब (एनसीसी) आणि युनिव्हर्सिटीचे मंडळातील सदस्यत्व कायमस्वरूपी संपुष्टात आले आहे.
- कार्यकारी समितीला अॅपेक्स काैन्सिलने बदलण्यात आले आहे. इलेक्टोरल अधिकारी, इथिक्स अधिकारी, एजंट रजिस्टर, खेळाडू संघटना यांचा समावेश करण्यात आला आहे.
- प्रशासकीय समितीने लाेढा समितीच्या शिफारशी केल्या लागू
- विदर्भाचेही पूर्णवेळ सदस्यत्व रद्द
-बिहार, नॉर्थ-ईस्टचे राज्य बनले बीसीसीआयचे मतदार

Next Article

Recommended