आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोढा समितीच्या शिफारशींमुळे शरद पवारांसह राजकीय आणि क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज मंडळी बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारशींमुळे राजकीय क्षेत्रातील आणि क्रिकेटमधील अनेक दिग्गज मंडळी बाहेर गेली आहेत. शरद पवार, फारुख अब्दुल्ला, ज्योतिरादित्य शिंदे, राजीव शुक्ला यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती अमित शहा यांनाही क्रिकेटचे दरवाजे बंद झाले आहेत.
 
उत्तम क्रिकेट प्रशासक आणि जुने संघटक आय. एस. बिंद्रा, एन. श्रीनिवासन, ए. सी. मुथय्या, निरंजन शहा यांचे क्रिकेट प्रशासक म्हणून भवितव्यही संपुष्टात आले आहे. प्रत्येक क्रिकेट संघटनेला कसा फटका बसेल ते बघा.

लोढा समितीमुळे देशातील हे दिग्गज जातील बाहेर 
पश्चिम विभाग :
१. मुंबई क्रिकेट असोसिएशन : शरद पवार (७०+) दिलीप वेंगसरकर, नितीन दलाल पी. व्ही. शेट्टी (कालावधी पूर्ण). २. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अजय शिर्के (कालावधी पूर्ण). ३.  सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निरंजन शहा (७०+), भरत शहा (७०+). ४. बडोदे क्रिकेट असोसिएशन, चिरायू अमीन (७०+). ५. गुजरात क्रिकेट असोसिएशन,  अमित शहा, नरहरी अमीन (कालावधी पूर्ण) 

पूर्व विभाग : १. बंगाल क्रिकेट असोसिएशन : विश्वजित डे, सबीर गांगुली, चित्रक मित्रा, गौतम दासगुप्ता (सर्व कालावधी पूर्ण). २. आसाम क्रिकेट असोसिएशन : गौतम रॉय व विकास बारुआ (कालावधी पूर्ण). ३. झारखंड क्रिकेट असोसिएशन : अमिताभ चौधरी व संजय सिंग (कालावधी पूर्ण). ४. ओडिशा क्रिकेट असोसिएशन : आशीर्वाद बेहरा व रणजित बिसवाल (कालावधी पूर्ण). ५. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशन : अरिंदम गांगुली (कालावधी पूर्ण).  

उत्तर विभाग :  १. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन : फारुख अब्दुल्ला व मोतीलाल नेहरू (७०+). 

हिमाचल प्रदेश: अनुराग ठाकूर (कालावधी पूर्ण). ३. पंजाब क्रिकेट असोसिएशन : आय. एस. बिंद्रा व एम. पी. पांडव (दोघे ७०+), जी. एस. बालिया (कालावधी पूर्ण). ४. हरियाणा क्रिकेट असोसिएशन : रणबीरसिंग (७०+), अनिरुद्ध चौधरी (कालावधी पूर्ण). ५. दिल्ली : अरुण जेटली, एस. पी. बन्सल, सी. के. खन्ना, चेतन चौहान व सुनील देव (सर्व कालावधी पूर्ण). 

दक्षिण विभाग : १. तामिळनाडू : एन. श्रीनिवासन व ए. सी. मुथय्या (७०+),
पी. एस. रामन व काशी विश्वनाथन (कालावधी पूर्ण).२. कर्नाटक क्रिकेट असोसिएशन : ब्रिजेश पटेल (कालावधी पूर्ण). ३. गोवा: विनोद फडके व चेतन देसाई (कालावधी पूर्ण).४. आंध्रप्रदेश : जी. गंगाराजू (कालावधी पूर्ण). ५) हैदराबाद क्रिकेट असोसिएशन : शिवलाल यादव, एम. श्रीधर, अर्शद अयुब, जी. विनोद (सर्व कालावधी पूर्ण).६.  विदर्भ क्रिकेट संघटना : शशांक मनोहर, अद्वैत मनोहर, सुधीर डबीर, प्रकाश दीक्षित (कालावधी पूर्ण).  

मध्य विभाग : १. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन :  राजीव शुक्ला (कालावधी पूर्ण), ज्योती बाजपेई (७०+).२. मध्य प्रदेश क्रिकेट संघटना : ज्योतिरादित्य शिंदे, संजय जगदाळे, एम. के. भार्गव (कालावधी पूर्ण). ३. छत्तीसगड क्रिकेट असोसिएशन : बलदेव सिंग भाटिया व राजेश दवे (सर्व कालावधी पूर्ण). ४. राजस्थान क्रिकेट असोसिएशन : किशोर रुंगठा, बी. आर. सोनी, ललित मोदी (सर्व कालावधी पूर्ण).
 
 
बातम्या आणखी आहेत...