आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध राज्य संघटना एकत्र, आज बंगळुरूमध्ये बैठक हाेणार; एन. श्रीनिवासन निमंत्रक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सर्वोच्च न्यायालयातील लढाईत अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के हे बीसीसीआयचे सेनानी कुचकामी ठरल्यानंतर हा लढा पुढे रेटण्यासाठी दिग्गज क्रिकेट प्रशासक एन श्रीनिवासन यांनी आता रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आहे. उद्या, शनिवारी, बंगळुरू येथे ताज ग्रुपच्या हॉटेलात श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या सर्व सदस्यांना आभार प्रदर्शनाचे निमित्त करून निमंत्रित केले आहे. ‘माझ्या सहकाऱ्यांचे मला आभार मानायचे आहेत’ हा या बैठकीचा मुखवटा’ असला तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या २ जानेवारीच्या आदेशाविरुद्ध काय करायचे, त्याबाबतची रणनीती या बैठकीत ठरणार आहे. बीसीसीआयच्या ३० पैकी २३ संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत आपला सहभाग निश्चित केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा बीसीसीआय आणि बिहार क्रिकेट असोसिएशन यांच्यातील वादावर दिला आहे. बीसीसीआयला कसोटी, एकदिवसीय किंवा टी-२० सामन्यांचे आयोजन करावे लागत नाही. आमच्या संघटनाच सामन्यांचे आयोजन करतात. त्या वेळी सदस्य संख्याबळ अधिक लागते. बीसीसीआय व संघटनांच्या कामकाजातही तफावत अाहे, असे सदस्यांना वाटते. 

व्यूहरचना हाेईल निश्चित
बीसीसीआय व सर्व राज्य संघटना यांच्या घटना, कार्यक्षेत्र, कामकाज, भूमिका, स्थावर मालमत्ता यामध्ये फरक आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य संघटनेची भूमिका न जाणून घेता, घेण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध लढण्याची व्यूहरचना उद्या निश्चित होण्याची शक्यता आहे.  बीसीसीआयची स्वत:ची मालमत्ता नाही, त्यांना खेळाडूंचे प्रशिक्षण, नियोजन, स्पर्धा आयोजन किंवा त्यांची स्थानिक स्पर्धांसाठी निवड करावी.

२३ प्रतिनिधी सहभागी 
या २३ जागांमध्ये कर्नाटकचे ब्रिजेश पटेल, श्रीनिवासन, राजीव शुक्ला, शिवलाल यादव, अर्षद अयुब, निरंजन शहा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आशिष शेलार, उपाध्यक्ष सी. के. खन्ना, मॅथ्यूज आदींचा समावेश आहे. सौरव गांगुलीने या बैठकीसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दालमिया यांच्या चिरंजीवांना पाठविण्याचा निर्णय घेतला.
 
 
बातम्या आणखी आहेत...