आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय अध्यक्षपदाची शर्यतीत, हे दिग्गज आहेत शर्यतीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर मंडळाच्या अध्यक्षपदासाठी वेगवान घडामोडी घडत आहेत. पूर्व विभागाने झारखंडच्या अमिताभ चौधरी यांच्या नावाचा आग्रह अध्यक्षपदासाठी केला आहे. याशिवाय मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष दिग्गज शरद पवार आणि आयपीएलचे आताचे चेअरमन राजीव शुक्ला यांची नावेही नव्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत आहेत.
एन. श्रीनिवासन यांचे अत्यंत घनिष्ठ असलेले अमिताभ चौधरी सध्या बीसीसीआयमध्ये संयुक्त सचिव आहेत. अमिताभ चौधरी यांच्या नावासाठी पूर्व विभागाने अाग्रह केला आहे. पूर्व विभागात बंगाल, आसाम, झारखंड, ित्रपुरा आणि नॅशनल क्रिकेट क्लब (एनसीसी) यांचा समावेश होतो. अमिताभ चौधरी यांचे नाव पुढे आल्याने आता अध्यक्षपदासाठी निवडणूकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, इतर विभागांतून त्यांना किती पाठिंबा मिळतो, हे महत्त्वाचे आहे.
श्रीनिंकडे आहेत १० मते
दालमिया यांच्या निधनानंतर नव्या अध्यक्षासाठी सर्व इच्छुक जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. बीसीसीआयचा नवा अध्यक्ष ठरवताना माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यांचा प्रभाव अजूनही मंडळावर आहे. श्रीनिवासन यांच्या भात्यात १० मते आहेत. याशिवाय त्यांना आसाम, बंगाल, ओडिशा आणि झारखंड यांचे समर्थन आहे.
ठाकूर यांची ताकद वाढली
बीसीसीआयच्या नियमानुसार जर मंडळाचे अध्यक्षपद ठरलेल्या कार्यकाळादरम्यान काही कारणास्तव रिक्त होत असेल, तर सचिव सर्वसाधारण सभा बोलावून नव्या अध्यक्षाची नियुक्ती करू शकतो. यामुळे नव्या अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत सध्याचे सचिव अनुराग ठाकूर मंडळाचा कारभार सांभाळतील. सध्या ठाकूर बीसीसीआयच्या सर्वाेच्चपदी आहेत. सर्व मदार त्यांच्यावरच आहे. येत्या १५ दिवसांत ठाकूर पुढच्या रणनीतीबाबत निर्णय घेतील. ठाकूर यांची भूमिका निर्णायक आणि महत्त्वाची ठरेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा कोण- कोण आहेत शर्यतीत...