आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानात क्रिकेटपटूंवर मधमाशांचा हल्लाबोल, वनडे सामन्यादरम्यान घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या लढतीत द. आफ्रिकेने श्रीलंकेवर ७ विकेटने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव अवघ्या ३९.२ षटकांत १६३ धावांत आटोपला. यानंतर यजमान आफ्रिकेने ३२  षटकांत ३ बाद १६४ धावा काढून सामना जिंकला. या सामन्यादरम्यान एक अजब घटना घडली. श्रीलंकेची टीम फलंदाजी करत असताना २५ व्या षटकाच्या वेळी मधमाशांनी क्रिकेटपटूंनी हल्लाबोल केला. मधमाशांचे एक कळप मैदानावर उतरले. यामुळे सामना थोड्या वेळेसाठी थांबवावा लागला. मधमाशांच्या डंखापासून वाचण्यासाठी खेळाडू आणि पंच जमिनीवर झोपले. मधमाशांनी मैदानावर प्रवेश केला तेव्हा क्रिस मॉरिस गोलंदाजी करत होता, तर श्रीलंकेकडून निरोशन डिकवेला आणि गुनारत्ने खेळत होते. मधमाशा बराच वेळ मैदानात होत्या. यामुळे खेळाडू रांगत रांगत मैदानाबाहेर गेले. कॅन्सरबद्दल जनजागृती व्हावी यासाठी आफ्रिकेचा संघ या सामन्यात गुलाबी रंगाचा ड्रेस घालून खेळत होता.   
श्रीलंकेची हाराकिरी :
यजमान आफ्रिकेने टॉस  जिंकून प्रथम गोलंदाजीचा िनर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या ३९.२ षटकांत १६३ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिकेने ३२ षटकांत ३ बाद १६४ धावा काढून विजय मिळवला. 
 
हेल्मेटवर बसल्या मधमाशा
मधमाशांनी आफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डीकॉकच्या हेल्मेटला टार्गेट  केले. शेकडो मधमाशा त्यावर बसल्या. याशिवाय खेळपट्टीजवळही मधमाशा होत्या. मधमाशांना पळवण्यासाठी त्यांच्यावर कोल्ड्रिंग टाकण्यात आले. मात्र, काहीच फायदा झाला नाही. यानंतर मैदानातील कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटिंगुशरच्या मदतीने मधमाशांना पळवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर सामना सुुरू झाला. यामुळे सामना जवळपास एक तास थांबलेला होता.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)